Home /News /technology /

WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

लस घेतल्यानंतर कोरोना सर्टिफिकेट (Corona Vaccine Certificate) अतिशय आवश्यक आहे. कोरोना सर्टिफिकेट अनेक प्रकारे डाउनलोड करता येतं. महत्त्वाची बाब म्हणजे WhatsApp वरुनही वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करता येऊ शकतं.

  नवी दिल्ली, 7 जानेवारी : देशभरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ओमिक्रॉन वेरिएंटचेही अनेक रुग्ण समोर आले आहेत. हे पाहता अनेक राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनच्या दिशेने पावलं उचलली आहेत. अशा काळात लसीकरण आणि लस घेतल्यानंतर कोरोना सर्टिफिकेट (Corona Vaccine Certificate) अतिशय आवश्यक आहे. कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेट अनेक प्रकारे डाउनलोड करता येतं. महत्त्वाची बाब म्हणजे WhatsApp वरुनही वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करता येऊ शकतं. WhatsApp वरुन असं डाउनलोड करा सर्टिफिकेट - मार्च 2020 मध्ये सरकारने MyGov Corona Helpdesk चॅटबॉट लाँच केलं होतं. याद्वारे कोविड सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. सर्वात आधी मोबाइलमध्ये 9013151515 हा नंबर MyGov Corona Helpdesk नावाने सेव्ह करा. त्यानंतर या नंबरवर Hi लिहून पाठवा. त्यानंतर अनेक पर्याय दिसतील. यात डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक करुन 2 लिहून पाठवा. त्यानंतर मोबाइल नंबरवर आलेला OTP टाका. त्यानंतर मोबाइलवर रजिस्टर्ड लोकांची लिस्ट दिसेल. यात ज्याचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे, ते सिलेक्ट करा. त्यानंतर मेसेजमध्ये वॅक्सिन सर्टिफिकेट मिळेल.

  Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

  आरोग्य सेतु App द्वारे मिळेल मदत - Corona Vaccine Certificate आरोग्य सेतु App वरुनही डाउनलोड करू शकता. App ओपन केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करा. त्यानंतर Cowin टॅबवर क्लिक करा. इथे 13 अंकी बेनिफीशियरी आयडी मागितला जाईल. बॉक्समध्ये आयडी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. इथे वॅक्सिन सर्टिफिकेट दिसेल. ते डाउनलोड करू शकता.

  काय आहे मास्क्ड Aadhaar Card? असा होईल फायदा, पाहा डाउनलोड करण्याची सोपी प्रोसेस

  Cowin App - https://www.cowin.gov.in/ वरुनही वॅक्सिन सर्टिफिकेट मिळू शकतं. इथे तुमच्या मोबाइल नंबरवरुन रजिस्टर करावं लागेल. OTP टाकल्यानंतर या वेबसाइटवरुन तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. त्याशिवाय Umang App वरुनही वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. उमंग App वर आधार कार्डद्वारे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Corona vaccination, Tech news, WhatsApp features, Whatsapp News, WhatsApp user

  पुढील बातम्या