नवी दिल्ली, 5 जानेवारी : तुम्हालाही कार खरेदी करायची आहे, पण ड्रायव्हिंग येत नसल्यास, स्वत:च गाडी चालवण्यासाठी आधी ड्रायव्हिंग शिकावं लागेल. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुति सुझुकी ड्रायव्हिंग कोर्स घेते. इथे अॅडमिशन घेऊन तुम्ही पूर्णपणे प्रोफेशनलरित्या कार चालवणं शिकू शकता. इथे ट्रॅफिक नियमही योग्यरित्या शिकता येतील. कंपनीने खास यासाठीच एक ड्रायव्हिंग स्कूल सेटअप केलं आहे. या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चार प्रकारचे कोर्स देण्यात आले आहेत. अजिबात ड्रायव्हिंग न येणाऱ्यांसाठी, तसंच ज्यांना गाडी चालवता येते परंतु एकट्याने गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही अशा लोकांसाठीही मारुति सुझुकीने ड्रायव्हिंग स्कूल सेटअप केलं आहे.
काय असतील कोर्स आणि फीस?
- Learner Standard Track Course ची फी 5500 रुपये आहे.
- Learner Extended Track Course साठी 7500 रुपये भरावी लागतील.
- Learner Detailed Track Course 9000 रुपयांत पूर्ण करता येईल.
- तर Advance Course साठी 4000 रुपये भरावे लागतील.
Learner Extended Track Course -
हा कोर्स ज्यांनी आतापर्यंत ड्रायव्हिंग केलं नाही अशा लोकांसाठी आहे. हा 26 दिवसांचा कोर्स आहे. तर मारुति सुझुकीच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, दुसरा Learner Detailed Track हा कोर्स 31 दिवसांचा आहे. यात 20 प्रॅक्टिकल सेशन, 5 सिम्यूलेटर सेशन आणि 4 थेअरी सेशन असतील.
Advance Course -
हा कोर्स अशा लोकांसाठी आहे, ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तर आहे, पण एकट्याने ड्रायव्हिंग करताना आत्मविश्वास नाही किंवा कमी आहे. हा कोर्स अशा लोकांसाठी आहे. या कोर्समध्ये एक प्रॅक्टिकल परीक्षा, 6 प्रॅक्टिकल सेशन आणि 2 थेअरी सेशन असतील.
Learner Standard Track Course -
हा कोर्स अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी कधीच कार ड्राइव्ह केली नाही. या कोर्समध्ये तुम्ही संपूर्ण ट्रॅफिक नियम आणि ऑन-रोड ड्रायव्हिंगद्वारे प्रॅक्टिकल अनुभव घेऊ शकता. यात 10 प्रॅक्टिकल सेशन असतील. त्याशिवाय 4 थेअरी आणि 5 सिम्यूलेटर सेशन असतील. हा Learner Standard Track Course 21 दिवसांचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, While driving