नवी दिल्ली, 9 मार्च : मोबाइल युजर्सला अनेकदा खराब नेटवर्क समस्येचा सामना करावा लागतो. टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे किंवा अधिक चार्जमुळे अनेक युजर्स आपला मोबाइल नंबर एखाद्या दुसऱ्या नेटवर्कमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतात. अशात अनेकांची रिलायन्स जिओला (Reliance Jio) मोठी पसंती आहे. चांगलं नेटवर्क, जबरदस्त डेटा स्पीड, स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे अनेक युजर्स आपला मोबाइल नंबर आधीच्या नेटवर्कमधून रिलायन्स जिओमध्ये पोर्ट (Mobile Number Portability) करतात. जर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर रियायन्स जिओमध्ये पोर्ट करायचा असेल, तर अतिशय सोप्या पद्धतीने हे काम करू शकता.
हे वाचा - विना Internet ही करता येईल WhatsApp Chat, करावं लागेल हे एक काम
Jio मध्ये कसा पोर्ट कराल तुमचा मोबाइल नंबर (Mobile Number Port to Jio) - - फोनमध्ये SMS बॉक्समध्ये PORT लिहून एक स्पेस देऊन तुमचा मोबाइल नंबर टाइप करा. - हा मेसेज 1900 या क्रमांकावर पाठवा. - त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल, त्यात UPC कोड आणि त्या कोडसाठीची एक्सपायरी डेट असेल. हा UPC कोड पोर्ट कोड (Unique porting code) असतो. - हा 8 अंकी यूनिक कोड असतो आणि तो काही दिवसांसाठीच वैध असतो. - हा यूनिक कोड घेऊन Jio आउटलेट किंवा Jio स्टोरमध्ये जा. - Reliance Jio आउटलेटमध्ये एक अॅप्लिकेशन फॉर्म भरुन घेतला जाईल. - MNP रिक्वेस्टसाठी (Mobile Number Portability) या फॉर्मसह पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्डची कॉपी द्यावी लागेल. - इथे एक Jio चं नवं Sim Card दिलं जाईल.
हे वाचा - Apple Event LIVE : आला रे आला, अॅपलचा स्वस्तात मस्त iPhone SE 3 आला!
या गोष्टी लक्षात ठेवा - तुमचा नंबर Reliance Jio मध्ये पोर्ट करताना सर्वात आधी तुमच्या सध्याच्या सुरू असलेल्या ऑपरेटरसह राहिलेले पेमेंट्स पूर्ण करा. जर तुम्ही एकाच टेलिकॉम सर्किलमध्ये नंबर पोर्ट करत असाल, तर वेरिफिकेशननंतर 3 दिवसांत तुमचा Jio Number अॅक्टिवेट होईल. दुसऱ्या टेलिकॉम सर्किलमध्ये पोर्टिंगसाठी 5 दिवसांचा कालावधी लागू शकतो. यादरम्यान तुमचा नंबर चालू राहिल. जम्मू-काश्मीर, आसाम ग्राहकांचा नंबर पोर्ट होण्यासाठी 15 दिवसांचा वेळ लागू शकतो.