मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /क्या बात है! WhatsApp कडून यूजर्सना मोठं गिफ्ट; लाँच होणार 'हे' 6 भन्नाट फीचर्स

क्या बात है! WhatsApp कडून यूजर्सना मोठं गिफ्ट; लाँच होणार 'हे' 6 भन्नाट फीचर्स

लवकरच काही धमाकेदार फीचर्स दाखल होण्याची शक्यता आहे.

लवकरच काही धमाकेदार फीचर्स दाखल होण्याची शक्यता आहे.

लवकरच काही धमाकेदार फीचर्स दाखल होण्याची शक्यता आहे.

  नवी दिल्ली, 09 सप्टेंबर : फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) या मेसेजिंग अॅपचा (Messaging App) वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील एक अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप ओळखलं जातं. कोणीही हे अॅप सहज वापरू शकतं त्यामुळे आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांमध्येही (Senior Citizens) हे अॅप लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवीन फीचर्स (New Features) आणि अपडेट्स (Updates) जारी करीत असते. आताही व्हॉट्सअॅपवर काही नवीन फीचर्सची झलक पाहायला मिळत असून, लवकरच काही धमाकेदार फीचर्स दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युझर्समध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे. जाणून घेऊया कोणती नवी फीचर्स येऊ घातली आहेत ते. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  मेसेज रिअॅक्शन फीचर

  व्हॉट्सअॅपवर लवकरच इन्स्टाग्रामसारखे मेसेज रिअॅक्शन फीचर (Message Reaction Feature) मिळणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, कंपनी अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींसाठी या फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे युझर्स मेसेजवर रिअॅक्शन इमोजीद्वारे आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतील. मेसेजच्या खाली इमोजींची यादी दिसेल. ही सुविधा ग्रुप चॅट आणि पर्सनल चॅट दोन्हीसाठी मिळणार आहे. मात्र यासाठी व्हॉट्सअॅप अपडेट करणं आवश्यक आहे.

  कॉन्टॅक्ट्स कार्ड दिसेल वेगळं

  व्हॉट्सअॅपवर आता कॉन्टॅक्ट्सची (Contacts) माहिती देणारं बटण कॉन्टॅक्टच्या नावापुढे दिसेल. त्यामुळे प्रोफाइल फोटो आता चौरस चौकटीत दिसणार नाही.

  चॅट बबलसाठी नवीन डिझाइन

  अँड्रॉइड युझर्ससाठी नवीन चॅट बबल (Chat Bubble) फीचरचे टेस्टिंग केलं जात असून, WABetaInfo च्या माहितीनुसार, आता चॅट बबल मोठे आणि हिरव्या रंगात असतील. यात नवीन बॅकग्राउंड कलर मिळू शकतो. तसंच लाईट आणि डार्क मोडचीही सोय असेल.

  हे वाचा - लाखो फोन्सवर बंद होणार Gmail, Maps आणि YouTube सारखे Google Apps, हे आहे कारण

  नवीन पेमेंट शॉर्टकट

  अँड्रॉइड युझर्सना व्हॉट्सअॅपच्या पेमेंट ऑप्शनचा (Payment Option) शॉर्टकट आता चॅट बारमध्येही (Chat Bar) दिसेल. अर्थात सध्याचा पेमेंट ऑप्शन न बदलता हे अतिरिक्त फिचर देण्यात येणार आहे.

  व्हॉइस मेसेजला नवीन इंटरफेस

  व्हॉइस मेसेजला (Voice Message) नवीन इंटरफेस (New Interface) देण्यात आला असून, आता युझर्स व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी तो ऐकू शकतील आणि नको असल्यास तो काढून टाकू शकतील.

  नवीन फोटो एडिटिंग टूल्स

  व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर करण्याचे प्रमाण मोठे आहे. युझर्स अनेक फोटो व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करत असतात. प्रोफाइल, स्टेटसमध्ये वापरत असतात. आता फोटोप्रेमी युझर्ससाठी फोटो एडिट (Photo edit) करण्यात उपयुक्त ठरणारे ‘ड्रॉइंग टूल्स’ (Drawing Tools) नावाचे एक नवीन फिचर दाखल करण्यात येणार आहे. यामुळे एडिटेड फोटोंवर स्टिकर्सही लावता येतील.

  व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या 6 नवीन फीचर्सबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून, युझर्समध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अत्यंत आतुरतेनं युझर्स याची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच त्यांची प्रतीक्षा संपेल अशी अपेक्षा आहे. आणखीही काही नवीन फीचर्सची चाचणी सुरू असून, आगामी काळात आणखी धमाकेदार फीचर्स येण्याची शक्यता आहे.

  First published:
  top videos

   Tags: Technology, Whatsapp