नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं पॉप्युलर इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. यात एकाच वेळी फोटो, ऑडिओ, व्हिडीओ, व्हाईस कॉल, व्हिडीओ कॉल, पेमेंट अशा अनेक गोष्टी करता येत असल्याने व्हॉट्सअॅपचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. यात चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याने ते सुरक्षित राहतात. परंतु यात डेटा प्रोटेक्शनही आवश्यक आहे. स्कॅमपासून वाचण्यासाठी WhatsApp सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं.
End to end encryption verify -
ज्यावेळी व्हॉट्सअॅप युजर कोणशीही चॅट करतो, त्यावेळी ते डिफॉल्ट एन्क्रिप्टेड असतात. परंतु जर एखादी खासगी माहिती बँकिंग डिटेल्स, कार्ड डिटेल्स युजर शेअर करत असेल, तर End to end encryption वेरिफाय करणं गरजेचं आहे.
यासाठी एखाद्या कॉन्टॅक्टसह चॅट विंडा ओपन करावी लागेल. त्यानंतर कॉन्टॅक्ट नेमवर टॅप करुन Encryption वर क्लिक करा. वेरिफाय करण्यासाठी स्कॅन बटणावर क्लिक करा.
Two-Step Verification -
WhatsApp मध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करुन सिक्योरिटी वाढवता येते. या टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे ज्यावेळी नव्या फोनवर, डिव्हाईसवर WhatsApp रजिस्टर केलं जाईल, त्यावेळी पिन मागितला जातो. त्यामुळे ही सेटिंग फायदेशीर ठरते. Two-Step Verification ऑन करण्यासाठी अकाउंट सेटिंगमध्ये, टू-स्टेप व्हेरिफिकेशनवर जाऊन सहा अंकी पिन कोड सेट करा. रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येऊ शकतो.
iCloud/ Google Drive Backup -
WhatsApp मध्ये चॅट्स End-to-end encrypted असतात. पण हे युजर्सला चॅट बॅकअप करण्यासाठी परमिशन देतं. WhatsApp Backup इन्क्रिप्टेड नाही. याबाबत सध्या WhatsApp टेस्ट करत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर चॅट्स इन्क्रिप्टेड असले, तरी बॅकअप इन्क्रिप्टेड नसल्याने ते लीक होण्याचा धोका असतो. त्यासाठी डेटा बॅकअप ऑफ करता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: WhatsApp chats, Whatsapp News, WhatsApp user