नवी दिल्ली, 7 जानेवारी : कोरोना महामारीच्या (corona pandemic) पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांनी आपले व्यवहार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (UPI) मदतीने करण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षी (2021) जून महिन्यातल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये एकूण दोन लाख 61 हजार 835 कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार झाले होते. त्याचा व्हॉल्यूम 134 कोटी रुपये इतका होता. तो एप्रिल आणि मेच्या तुलनेत अनुक्रमे 73 आणि 34 टक्क्यांनी जास्त होता. या आकडेवारीमध्ये यूपीआय अॅप्लिकेशन्सद्वारे (UPI Applications) व्यवहार करणाऱ्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांचा समावेश होता. सध्या भारतामध्ये गुगल पे (Google Pay), फोनपे (PhonePe), अॅमेझॉन पे (Amazon Pay), भीम (Bharat Interface for Money - BHIM) ही यूपीआय सुविधा पुरवणारी मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत.
इन्स्टंट पैसे पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी, युटिलिटी बिल्स (utility bills) भरण्यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. हे व्यवहार करताना ग्राहकांना (consumers) काही वेळा समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. त्याबाबत असंख्य तक्रारीही आल्या आहेत. प्रत्येक यूपीआय मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये व्यवहारांशी संबंधित तक्रारी (complaints) नोंदवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. भीम (BHIM) यूपीआय अॅपचा वापर करणारे ग्राहक कशा प्रकारे ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. भीम हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) डेव्हलप केलेलं आहे. खाली अशा काही प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत, जे अनेक ग्राहकांनी विचारले आहेत.
भीम मोबाइल अॅपवर ट्रान्झॅक्शनशी संबंधित तक्रार कशी नोंदवता येते?
भीम यूपीआय अॅप्लिकेशनमध्ये 'रेज ए कंप्लेंट' या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री (transaction history) मिळेल. तुम्हाला ज्या ट्रान्झॅक्शनबाबत तक्रार करायची आहे, ते सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर, रेझ कन्सर्न आणि कॉल बँक असे दोन ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला ट्रान्झॅक्शनबाबत तक्रार करायची असेल तर 'रेझ कन्सर्न' (raise concern) ऑप्शनवर क्लिक करा. तिथे नेमकी तक्रार काय आहे ते नोंदवा व ते सबमिट करा. तक्रार करण्यासाठी तुम्हाला भीम अॅप्लिकेशनच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी बोलायचं असेल, तर 'कॉल बँक' हा ऑप्शन निवडा. यामुळे तुम्ही 1800-120-1740 या टोल-फ्री क्रमांकावर भीमच्या कस्टमर केअर सर्व्हिससोबत (customer care service) जोडले जाल. अशा प्रकारे तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही थेट यूपीआय कस्टमर केअर हेल्पलाइन नंबरदेखील डायल करू शकता.
भीम यूपीआयमध्ये ‘गेट इन टच’ सर्व्हिस काय आहे?
‘गेट इन टच’ (Get in Touch) हा एक कस्टमर केअर प्लॅटफॉर्म आहे. त्या ठिकाणी ग्राहकांच्या भीम यूपीआय संबंधित तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. लॉगिन, रजिस्ट्रेशन, ट्रान्झॅक्शन, कॅशबॅक, पिन, बँक अकाउंटशी संबंधित कोणत्याही तक्रारी या ठिकाणी नोंदवता येतात.
‘गेट इन टच’ सर्व्हिस वापरून तक्रार कशी नोंदवावी?
लॉगिन, रजिस्ट्रेशन, ट्रान्झॅक्शन, कॅशबॅक, पिन, बँक अकाउंटशी संबंधित कोणतीही तक्रार भीम यूपीआय अॅपवर नोंदवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- भीम अॅप्लिकेशन किंवा वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ‘गेट इन टच’ पेजवर जा. तिथे कप्लेंट, क्वेरी आणि फीडबॅक असे तीन सेगमेंट्स तुम्हाला दिसतील.
- कंप्लेंट सेगमेंटमध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन/ कॅशबॅक / लॉगिन यांपैकी योग्य पर्याय निवडावा लागेल.
- प्रत्येक तक्रारीमध्ये अनेक फिल्ड्स आहेत. समस्येचा प्रकार, व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA), व्यवहाराची तारीख, ई-मेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि तुमची समस्या थोडक्या शब्दांत, अशी माहिती तिथे भरावी लागते.
ऑनलाइन तक्रार फॉर्ममध्ये अनिवार्य माहिती भरल्यानंतर एक कॅप्चा टाकावं लागेल. त्यानंतर फॉर्म सबमिट करणं आवश्यक आहे. त्यानंतर भीम अॅपची कस्टमर सपोर्ट टीम तुम्हाला ई-मेल करील.
मी माझ्या बँकेचं यूपीआय अॅप्लिकेशन वापरून ट्रान्झॅक्शन केलं आहे. त्याच्याशी संबंधित तक्रार कुठे करता येईल?
तुमच्यापैकी काही जण यूपीआय ट्रान्झॅक्शनसाठी कदाचित तुमच्या बँकेचं मोबाइल अॅप्लिकेशन वापरत असाल. अशा वेळी तुमच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भीम कस्टमर सर्व्हिसऐवजी स्वतंत्र कस्टमर सपोर्ट असलेल्या तुमच्या बँकेशी संपर्क साधावा. उदाहरणार्थ, तुम्ही भीम एसबीआय पे (BHIM SBI Pay) मोबाइल अॅप्लिकेशन वापरत असाल, तर तर तक्रार नोंदवण्यासाठी एसबीआय कस्टमर केअरचा आधार घ्यावा लागेल. हाच नियम इतर बँकांच्या यूपीआय अॅपसाठीही लागू होतो.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये आलेल्या अडचणींची तक्रार नोंदवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.