नवी दिल्ली, 13 एप्रिल : इंडियन रेल्वेमधून
(Indian Railway) दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणतीतरी ट्रेन लेट झाल्याची माहिती मिळते. थंडीच्या दिवसात धुक्यामुळे, पावसात पाणी साचल्यामुळे किंवा कोणत्याही इतर वेळी तांत्रिक कारणामुळे अनेकदा ट्रेन लेट होते. अशात ट्रेन कुठे पोहोचली, किती लेट आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. लाइव्ह रनिंग स्टेटस ट्रॅक करणं गरजेचं असतं. ट्रेनचं लाइव्ह स्टेटस चेक करण्यासाठी काही Apps चा वापर केला जातो. ज्यात ट्रेन येण्याचा वेळ समजतो. अशात आता गुगल मॅप्सनेही नवं फीचर जोडलं आहे.
ट्रेन प्रवाशांचा प्रवास सोपा करण्यासाठी गुगल मॅप्सने
(Google Maps) एक नवं फीचर, नवं अपडेट दिलं आहे. हे फीचर लाइव्ह ट्रेन स्टेटसचं आहे. या फीचरद्वारे तुम्हाला ट्रेन येण्याची वेळ, शेड्युल, लेट झाल्याचं स्टेस आणि इतरही माहिती Google Maps द्वारे मिळेल.
या फीचरसाठी गुगलने Where is My Train App सह पार्टनरशिप केली आहे. Google Maps वर Live Train Status अपडेटची सुविधा मिळवण्यासाठी जवळपास तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये अँड्रॉइड आणि iOS वर्जनवर सुरु करण्यात आली होती. तुम्हालाही मॅपवर लाइव्ह स्टेटस चेक करायचं असेल, तर यासाठी सोपी प्रोसेस आहे.
- सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये Google Maps ओपन करावा लागेल.
- त्यानंतर सर्च बॉक्समध्ये डेस्टिनेशन स्टेशन एंटर करा.
- आता डेस्टिनेशन डायलॉग बॉक्सखाली टू-व्हीलर आणि वॉक आयकॉनदरम्यान असलेल्या ट्रेन आयकॉनवर क्लिक करा.
- त्यात ट्रेन आयकॉन ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर लाइव्ह ट्रेन स्टेटस चेक करण्यासाठी ट्रेनच्या नावावर टॅप करा.
- आता तुमच्या ट्रेनचं लाइव्ह स्टेटस दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.