Home /News /technology /

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; या वाहनांवर आकारला जाणार Green Tax

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; या वाहनांवर आकारला जाणार Green Tax

देशातील रस्त्यांवर अद्यापही 15 वर्षाहून अधिक जुन्या जवळपास 4 कोटी गाड्या धावत आहेत. ही वाहनं ग्रीन टॅक्सअंतर्गत येतात. 15 वर्ष जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्यांना यापूर्वीच पाठवण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 28 मार्च : देशातील रस्त्यांवर अद्यापही 15 वर्षाहून अधिक जुन्या जवळपास 4 कोटी गाड्या धावत आहेत. ही वाहनं ग्रीन टॅक्सअंतर्गत येतात. सर्वाधिक जुनी वाहनं असणाऱ्या शहरांमध्ये कर्नाटक वरच्या स्थानी आहे. कर्नाटकातील रस्त्यांवर अशी 70 लाख वाहनं अद्यापही चालू स्थितीत आहेत. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात अशा वाहनांचे आकडे डिजिटल केले आहे. यात केवळ आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि लक्षद्वीप या राज्यांचे आकडे सामिल नाहीत. 15 वर्ष जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्यांना यापूर्वीच पाठवण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, चार कोटीहून अधिक वाहनं 15 वर्षाहून अधिक जुनी आहेत. यापैकी 2 कोटी वाहनं, तर 20 वर्षाहून अधिक जुनी आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल रेकॉर्ड केंद्रीयकृत वाहन डेटाबेसवर आधारित आहे. या आकडेवारीत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि लक्षद्वीप ही राज्य सामिल नाहीत. जुन्या, प्रदूषण करणाऱ्या वाहनांमध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशात अशा वाहनांची संख्या 56.54 लाख आहे, ज्यात 24.55 लाख वाहनं 20 वर्षाहून अधिक जुनी आहेत. राजधानी दिल्ली यात तिसऱ्या स्थानी आहे. दिल्लीत 49.93 लाख जुनी वाहनं असून त्यापैकी 35.11 लाख वाहनं 20 वर्षाहून अधिक जुनी आहेत. केरळमध्ये 34.64 लाख, तमिलनाडुमध्ये 33.43 लाख, पंजाबमध्ये 25.38 लाख आणि पश्चिम बंगालमध्ये 22.69 लाख अशी वाहनं आहेत. तर महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान, हरियाणामध्ये जुन्या वाहनांची संख्या 17.58 लाख ते 12.29 लाख दरम्यान आहे. (वाचा - वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचे सर्वसामान्यांना होणार हे 5 मोठे फायदे; जाणून घ्या डिटेल्स) केंद्राकडून राज्यांना प्रस्ताव - सरकार, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी अशा जुन्या वाहनांवर लवकरच ग्रीन टॅक्स लावण्याच्या तयारीत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये प्रदूषण पसरवणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव चर्चेसाठी राज्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांना हा प्रस्ताव औपचारिकरित्या अधिसूचित केला जाईल. प्रस्तावाअंतर्गत, 8 वर्षाहून अधिक जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र रिन्यूवल करताना रोड टॅक्सच्या 10 ते 25 टक्के दराने कर आकारला जाईल. 15 वर्ष जुन्या वैयक्तिक वाहनांवर हा कर आकारण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर कमी ग्रीन टॅक्स लावला जाईल. त्याशिवाय अतिशय अधिक प्रमाणात प्रदूषित शहरांमध्ये नोंदवण्यात आलेल्या वाहनांवर रोड टॅक्सच्या 50 टक्के दराने कर आकारला जाण्याचा प्रस्ताव आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Car, India, Money, Nitin gadkari, Tax, Union Finance Minister, Vehicles

    पुढील बातम्या