नवी दिल्ली, 7 जानेवारी : सध्या Digital Health ID फायद्याचं ठरतं आहे. या कार्डच्या मदतीने तुम्ही हेल्थ आयडी क्रिएट करुन तुमची संपूर्ण आरोग्यसंबंधी माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवू शकता. आणि गरज पडल्यास सहजपणे अॅक्सेस करता येऊ शकते. हेल्थ आयडीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, मोबाइल नंबर अशी माहिती द्यावी लागते. काय आहे Digital Health ID - डिजीटल हेल्थ आयडी कार्ड सर्व लोकांसाठी आपल्या आरोग्यासंबंधीचा डेटा एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सोपा उपाय आहे. याच्या मदतीने सर्व रुग्णांची माहिती आणि हेल्थ रेकॉर्ड ऑनलाइन स्टोर केला जातो. यामुळे रुग्ण कोणत्याही रुग्णालयात गेल्यास, त्याला आपल्यासोबत हेल्थ रेकॉर्ड कागदपत्र घेऊन जावं लागत नाही. हे डिजीटल हेल्थ आयडी कार्ड रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठी सुविधाजनक ठरतं. त्याशिवाय कोणतेही डॉक्युमेंट हरवण्याचंही टेन्शन नाही.
WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस
कसं कराल अप्लाय? - डिजीटल हेल्थ मिशनची अधिकृत वेबसाइट https://abdm.gov.in/ वर जावं लागेल. - समोर एक पेज ओपन होईल. इथे क्रिएट हेल्थ आयडी लिंकवर क्लिक करावं लागेल. - पुन्हा एक पेज ओपन होईल आणि Create your health id now चा पर्याय दिसेल. त्यावर सिलेक्ट करा. - इथे कोणत्या माध्यमातून आयडी जनरेट करायचा आहे तो पर्याय निवडावा लागेल. आधार कार्डद्वारे आयडी जनरेट करायचा असल्यास, Generate via Aadhaar Card सिलेक्ट करावं लागेल. अन्यथा मोबाइलद्वारेही ID जनरेट करता येईल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाका. - नंबर टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या नंबरवर OTP येईल. OTP टाकून पुढील प्रोसेस करा. - समोर एक फॉर्म ओपन होईल, त्यात विचारलेली सर्व माहिती द्यावी लागेल. ती माहिती सबमिट केल्यानंतर Health ID जनरेट होईल.