नवी दिल्ली, 18 जानेवारी : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारीसह प्रत्येक खासगी कामासाठीही आधार कार्डची गरजेचं आहे. त्याशिवाय आधार कार्ड इतर डॉक्युमेंटशी लिंक असणंही अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डचा आपल्या नकळत इतर कोणत्या ठिकाणी वापर तर होत नाही, हे पाहणं गरजेचं आहे. UIDAI ने यासाठी सुविधा दिली आहे. याद्वारे आधार कार्डचा कुठे वापर केला जातो किंवा आधी कुठे करण्यात आला आहे, याबाबत माहिती मिळू शकते.
Aadhaar Card संबंधी अनेक फ्रॉड सतत समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आधार कार्डबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. वेळोवेळी (Aadhaar card history checking) तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं जात आहे आणि कोणत्या इतर डॉक्युमेंटशी लिंक आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे. तुमचं लक्ष नसताना इतर कोणी व्यक्ती याचा गैरवापर करत असल्याची घटना घडू नये. त्यामुळे आधार कार्ड हिस्ट्री (Aadhaar Card History) तपासणं गरजेचं आहे.
अशी तपासा Aadhaar Card History -
- सर्वात आधी आधार कार्डची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर लॉगइन करा.
- इथे My Aadhaar पर्यायाची निवड करा.
- Aadhaar Services ऑप्शन खाली, Aadhaar Authentication History दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता नवी विंडो ओपन होईल. इथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका. सिक्योरिटी कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
- आता आधार कार्डची हिस्ट्री तुम्ही डाउनलोड करू शकता. हिस्ट्री योग्यप्रकारे तपासा. काही चुकीची माहिती आढळल्यास, त्याबाबत लगेच तक्रार करुन योग्य ती पाऊलं उचला.
कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card -
दरम्यान, एका व्यक्तीचं एक आधार कार्ड असतं. आधार कार्ड एक असलं, तरी एका व्यक्तीचे अनेक मोबाइल नंबर आणि अनेक बँक अकाउंटही असतात. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो की आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटशी आणि मोबाइल नंबरशी लिंक आहे. घरबसल्या ऑनलाइनरित्या कोणत्या बँकेशी, मोबाइल नंबरशी आधार लिंक आहे, हे तपासता येतं.
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा.
- इथे Check Your Aadhaar and Bank Account वर क्लिक करा.
- इथे आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.
- आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
- OTP UIDAI वेबसाइटवर टाका.
- इथे लॉगइन ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा.
- लॉगइन केल्यानंतर आधारशी जोडलेली सर्व बँक अकाउंट्स डिटेल्स समोर येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.