मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp ची ही सेटिंग माहितेय का? तुमच्या भाषेत वापरता येईल App

WhatsApp ची ही सेटिंग माहितेय का? तुमच्या भाषेत वापरता येईल App

सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Settings वर क्लिक करा. यात अनेक ऑप्शन्स दिसतील.

सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Settings वर क्लिक करा. यात अनेक ऑप्शन्स दिसतील.

भारतात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. या युजर्सला आकर्षित करण्यासाठी WhatsApp क्षेत्रिय भाषांना सपोर्ट करतं. म्हणजेच तुम्ही तुमच्या लोकल भाषेत या WhatsApp चा वापर करू शकता.

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे अपडेट देत असतं. भारतात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. या युजर्सला आकर्षित करण्यासाठी WhatsApp क्षेत्रिय भाषांना सपोर्ट करतं. म्हणजेच तुम्ही तुमच्या लोकल भाषेत या WhatsApp चा वापर करू शकता.

WhatsApp मध्ये हिंदी, बंगाली, तमिळ, गुजराती, कन्नडसह अनेक भाषांमध्ये सपोर्ट मिळतो. दोन प्रकारच्या भाषांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही संपूर्ण स्मार्टफोनची भाषा (Smartphone  Language) बदलू शकता किंवा केवळ व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये (WhatsApp Setting) बदल करुनही या फीचरचा वापर करू शकता.

WhatsApp ऑटोमेटिक डिफॉल्ट भाषेवर काम करतं. म्हणजेच स्मार्टफोनमध्ये तुम्ही जी भाषा वापराल, त्याच भाषेत WhatsApp देखील वापरू शकता. तुम्ही फोनची भाषा बदलली की व्हॉट्सअ‍ॅपची भाषाही आपोआप बदलेल. अँड्रॉईड युजर्सला (Android Users) आपल्या फोनची भाषा बदलण्यासाठी सर्वात आधी फोनच्या Setting मध्ये जावं लागेल. त्यानंतर System पर्यायात Language and Input वर क्लिक करुन Languages वर जावं लागेल. इथे तुमची भाषा सिलेक्ट करुन फोन वापरु शकता.

हे वाचा - WhatsApp वर येणार भन्नाट फीचर, मिळतील 2 नवे टॅब; असा होईल फायदा

iPhone युजर्सही iPhone Setting मध्ये बदल करू शकतात. इथे Language and Region चा पर्याय मिळेल. त्यात iPhone Language वर क्लिक करावं लागेल. तुमची भाषा निवडल्यानंतर Change to Language वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर WhatsApp तुमच्या भाषेत काम करेल.

हे वाचा - मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

युजर्स थेट WhatsApp मधूनही व्हॉट्सअ‍ॅपची भाषा बदलू शकतात. त्यासाठी WhatsApp Setting मध्ये जावं लागेल. इथे चॅट (Chats) वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर App Language वर टॅप करावं लागेल. आता तुमची भाषा निवडा. या सेटिंगनंतर तुम्ही तुमच्याच भाषेत WhatsApp Chat करू शकाल.

First published:

Tags: Smartphone, Tech news, Technology, Whatsapp, WhatsApp chats, WhatsApp features, Whatsapp New Feature, Whatsapp News, WhatsApp user