Home /News /technology /

भारतात आता पासपोर्ट मिळवणं आणखी सोपं, ऑनलाईन अर्जानंतर करावी लागेल फक्त 'ही' एक गोष्ट

भारतात आता पासपोर्ट मिळवणं आणखी सोपं, ऑनलाईन अर्जानंतर करावी लागेल फक्त 'ही' एक गोष्ट

भारतात आता पासपोर्टसाठी अप्लाय करणं अतिशय सहज-सोपं झालं आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलवरुन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. अपॉईंटमेंट घेतल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात वेरिफिकेशनसाठी जावं लागेल.

  नवी दिल्ली, 14 एप्रिल : भारतात आता पासपोर्टसाठी अप्लाय करणं अतिशय सहज-सोपं झालं आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलवरुन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. अपॉईंटमेंट घेतल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात वेरिफिकेशनसाठी जावं लागेल. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन ऑनलाईन पासपोर्टसाठी अप्लाय करता येऊ शकतं. तसंच पासपोर्टसाठी ओरिजनल डॉक्युमेंट्स असावे लागतील. हे डॉक्युमेंट्स पासपोर्ट ऑफिसमध्ये चेक केले जातात. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर 90 दिवसांच्या आत पासपोर्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. कोरोना गाईडलाईन्स फॉलो करुनच पासपोर्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवा पोर्टलवर जावं लागेल. येथे रजिस्टर नाऊवर लिंकवर क्लिक करा. नंतर यात संपूर्ण डिटेल्स भरावे लागतील. येथे तुमच्या जवळचं पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करू शकता, जिथे वेरिफिकेशनसाठी जावं लागेल. एकदा डिटेल्स भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा. त्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा. आता पासपोर्ट सेवा पोर्टलवर आपल्या रजिस्टर्ड आयडीने लॉगईन करा. येथे Apply for Fresh Passport/ Re-issue of passport लिंकवर क्लिक करा.

  (वाचा - Google Chrome च्या 5 जबरदस्त सिक्रेट ट्रिक्स; जाणून घ्या तुमच्या कामाची गोष्ट)

  फ्रेश पासपोर्टवर तरच अप्लाय करा, जर तुमच्याकडे आधी कोणताही पासपोर्ट नसेल. जर पासपोर्ट आधीच असेल, तर Re-issue कॅटेगरीमध्ये जा. येथे सर्व आवश्यक माहिती भरा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. येथे पे अँड शेड्युल युअर अपॉईंटमेंटवर क्लिक करुन पे करावं लागेल. त्यानंतर अपॉईंटमेंट शेड्युल करता येईल.

  (वाचा - या राज्यात आता फ्री मिळणार ISI मार्क हेल्मेट; सरकारकडून कंपन्यांना निर्देश)

  यासाठी एक मेसेज मिळेल किंवा या फॉर्मची प्रिंटही घेऊ शकता. त्यानंतर Application receipt आणि ओरिजनल डॉक्युमेंट्ससह पासपोर्ट ऑफिसला जावं लागेल. येथे वेरिफिकेशन झाल्यानंतर पोस्टाद्वारे तुमच्या घरी पासपोर्ट येईल. यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: India, International, Online, Passport, Tech news, Technology

  पुढील बातम्या