Home /News /technology /

Google Chrome च्या 5 जबरदस्त सिक्रेट ट्रिक्स; जाणून घ्या तुमच्या कामाची गोष्ट

Google Chrome च्या 5 जबरदस्त सिक्रेट ट्रिक्स; जाणून घ्या तुमच्या कामाची गोष्ट

गुगल क्रोम (Google Chrome) जगातील सर्वाधिक वापर केलं जाणारं इंटरनेट ब्राउजर (Internet browser) आहे. परंतु गुगलचे असे काही सिक्रेट फीचर्स आहेत, ज्याचा तुम्ही कदाचित वापर केला नसेल.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल: गुगल क्रोम (Google Chrome) जगातील सर्वाधिक वापर केलं जाणारं इंटरनेट ब्राउजर (Internet browser) आहे. या ब्राउजरच्या इतक्या जास्त वापरानंतरही अनेकांना याच्या काही फीचर्सबाबत माहिती नाही. परंतु गुगलचे असे काही सिक्रेट फीचर्स आहेत, ज्याचा तुम्ही कदाचित वापर केला नसेल. गेस्ट मोड - जर इंटरनेट ब्राउजिंग सिक्रेट ठेवायची असेल, तर या गेस्ट मोडचा वापर करता येऊ शकतो. यासाठी गुगल अकाउंट अवतारवर जाऊन गेस्ट मोडवर क्लिक करुन याचा वापर करता येऊ शकतो. इन-बिल्ट स्कॅनर - गुगल क्रोममध्ये एक इन-बिल्ट स्कॅनरही असतो, ज्याचा वापर करुन युजर सिस्टम स्कॅन करुन व्हायरस हटवू शकतात. स्कॅन करण्यासाठी सेटिंगमध्ये एडवान्स ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर रिसेट आणि क्लिन-अप ऑप्शनवर क्लिक करुन व्हायरस स्कॅन करता येईल. सेंड युअर डिव्हाईस ऑप्शन - सेंड युअर डिव्हाईस ऑप्शनचा वापर करुन युजर आपल्या कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर ओपन टॅबचा आपल्या फोनमध्येही वापर करू शकतात. यासाठी युआरएलवर जाऊन राईट क्लिक करावं लागेल, त्यानंतर सेंड युअर डिव्हाईसवर क्लिक करावं लागेल. कास्ट ऑप्शन - कास्ट ऑप्शनद्वारे युजर आपल्या क्रोमकास्ट डिव्हाईसवर आपल्या ब्राउजर टॅबचा वापर करू शकतात. कास्ट ऑप्शनवरुन यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचाही एक्सेस करु शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. येथे खाली कास्ट ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करुन याचा वापर करता येईल. गुगलने आपल्या ब्लॉगद्वारे जानेवारी 2021 मध्ये एक खास फीचर लाँच केलं होतं. ज्यात युजर्स गुगल क्रोम ब्राउजरवर स्क्रिन शेअरिंगदरम्यान नोटिफिकेशन्स हाईड करु शकतील. या फीचरच्या वापरानंतर युजरचं कोणतंही नोटिफिकेशन व्हिडीओ कॉलिंगमध्ये स्क्रिन शेअरिंग दरम्यान इतरांना दिसणार नाही.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Google, Internet, Sharing, Tech news, Technology, Tips

    पुढील बातम्या