जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / या राज्यात आता फ्री मिळणार ISI मार्क हेल्मेट; सरकारकडून कंपन्यांना निर्देश

या राज्यात आता फ्री मिळणार ISI मार्क हेल्मेट; सरकारकडून कंपन्यांना निर्देश

या राज्यात आता फ्री मिळणार ISI मार्क हेल्मेट; सरकारकडून कंपन्यांना निर्देश

टू-व्हिलर वाहनाच्या विक्रीवेळी आता डीलरला वाहनासोबत हेल्मेटही द्यावं लागेल, असे निर्देश देण्यात आले आहेत. टू-व्हिलर चालकांची सुरक्षितता लक्षात घेता, डीलर्सला गाडीसोबत फ्री हेल्मेट देण्यासाठीच्या सूचना करण्यात आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 एप्रिल : टू-व्हिलर (Two wheeler) चालकांना आता हेल्मेट (Helmet) खरेदी करण्याची गरज लागणार नाही. हेल्मेट घालणं अनिवार्य आहे, तर खरेदी करण्याची गरज कशी लागणार नाही? असा प्रश्न पडू शकतो. मात्र राजस्थान (Rajasthan) ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सिंह खाचरियावास यांनी, टू-व्हिलर वाहनाच्या विक्रीवेळी आता डीलरला वाहनासोबत हेल्मेटही द्यावं लागेल, असे निर्देश दिले आहेत. टू-व्हिलर चालकांची सुरक्षितता लक्षात घेता, डीलर्सला गाडीसोबत फ्री हेल्मेट देण्यासाठी सांगण्यात आल्याचं, खाचरियावास यांनी सांगितलं. रस्ते अपघातातील जखमी आणि मृत्यूमुखी होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अनेक जण पैशांच्या कमतरतेमुळे साधारण हेल्मेट घेतात, जे अपघातावेळी फायद्याचं ठरतच असं नाही. सरकारकडून आता ISI मार्क असणारे मजबूत हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

(वाचा -  ड्रायव्हिंग टेस्टवेळी या चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या लक्ष )

राजस्थान सरकारने मागील वर्षी मार्च महिन्यात अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु कोरोनामुळे यावर काम करण्यात आलं नव्हतं. परंतु आता या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला असून राजस्थानमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.

(वाचा -  पैसे न भरता मोफत पाहा Netflix; जाणून घ्या कसं मिळवाल फ्री सब्सक्रिप्शन )

दिल्ली उच्च न्यायालयाकडून सोमवारी भारतीय मानक ब्युरोला (BSI) हेल्मेटची निर्मिती आणि विक्रीवर कठोर लक्ष ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे. एका एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती प्रतिभा एम.सिंह यांनी सांगितलं की, वाहन चालकाची सुरक्षा लक्षात घेता, हेल्मेट तयार करणं आणि त्याच्या विक्री करण्याकडे काटेकोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे. तसंच याबाबतचा रिपोर्ट दाखल करुन हेल्मेटच्या निर्मिती आणि विक्रीदरम्यान ISI चिन्हाचा गैरवापर होत नाही ना याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात