मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Spam Mail द्वारे पालटलं महिलेचं नशीब, जिंकली कोट्यवधींची लॉटरी

Spam Mail द्वारे पालटलं महिलेचं नशीब, जिंकली कोट्यवधींची लॉटरी

Spam Mail द्वारे ऑनलाइन फ्रॉड केले जाण्याची शक्यताही असते. त्यामुळे अशा मेलकडे अधिक लक्ष दिलं जात नाही. पण एका अशाच स्पॅम मेलमुळे महिलेचं नशीबच पालटलं आहे.

Spam Mail द्वारे ऑनलाइन फ्रॉड केले जाण्याची शक्यताही असते. त्यामुळे अशा मेलकडे अधिक लक्ष दिलं जात नाही. पण एका अशाच स्पॅम मेलमुळे महिलेचं नशीबच पालटलं आहे.

Spam Mail द्वारे ऑनलाइन फ्रॉड केले जाण्याची शक्यताही असते. त्यामुळे अशा मेलकडे अधिक लक्ष दिलं जात नाही. पण एका अशाच स्पॅम मेलमुळे महिलेचं नशीबच पालटलं आहे.

वॉशिंग्टन, 25 जानेवारी : जंक मेल किंवा स्पॅम मेलकडे (Spam Mail) आपण कोणीही लक्ष देत नाही आणि असे मेल डिलीट केले जातात. अनेकदा Spam Mail द्वारे ऑनलाइन फ्रॉड केले जाण्याची शक्यताही असते. त्यामुळे अशा मेलकडे अधिक लक्ष दिलं जात नाही. पण एका अशाच स्पॅम मेलमुळे एका महिलेचं नशीबच पालटलं आहे.

अमेरिकेतील एका महिलेसोबत हा स्पॅम मेलसंबंधी प्रकार समोर आला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील लॉरा स्पियर्स या 55 वर्षीय महिलेने स्पॅम मेलद्वारे तब्बल 30 लाख डॉलरची लॉटरी जिंकली आहे. भारतीय रुपयानुसार ही रक्कम जवळपास 22.41 कोटी इतकी होते. याबाबत बोलताना तिने सांगितलं, की 'मी माझ्या मेल बॉक्स (Mail Box) मध्ये कोणाचातरी मेल शोधत होती. त्यासाठीच मी स्पॅम फोल्डर (Spam Folder)तपासत होती. त्याचवेळी अचानक माझी नजर एका स्पॅम मेलवर (Spam Mail) गेली. त्यात मला लॉटरी (Lottery) लागल्याचं सांगण्यात आलं होतं. त्या मेलमध्ये मला 3 मिलियन डॉलरचं रोख बक्षिक जिंकल्याचं लिहिलं होतं.'

लॉरा स्पियर्सने याबाबत बोलताना पुढे म्हटलं, की 'मला सर्वात आधी यावर विश्वास बसला नाही. कारण हा Spam Mail होता. तरीही मी माझं लॉटरीचं तिकीट चेक केलं. Spam Mail मध्ये दिलेल्या माहितीचा नंबरच माझ्याकडे होता. त्यावेळी मी अतिशय खूश झाले.' आता मी सगळे Spam Mail अतिशय काळजीपूर्वक तपासणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

हे वाचा - टॅक्स रिफंड, लॉटरी ऑफरपासून सावधान, Online Fraud मध्ये रिकामं होईल बँक अकाउंट

मिळालेल्या माहितीनुसार, आता लॉरा स्पियर्स वेळेआधीच रिटायरमेंट घेण्याचा विचार करत आहे. त्यांनी मिशिगन लॉटरीची (Michigan Lottery) मेगा मिलियन लॉटरी जिंकली (Mega Million Lottery) आहे.

हे वाचा - खांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव

मेगा मिलियन लॉटरीचं (Mega Million Lottery) तिकीट अमेरिकेतील 45 राज्यात 2 डॉलरच्या किमतीत उपलब्ध असते. या लॉटरीद्वारे 2018 मध्ये दक्षिणी-कॅरोलीनातील एका विजेत्याने 1.6 अब्ज डॉलरचं बक्षिक जिंकलं होतं.

First published:
top videos

    Tags: Lottery, Spam mails