मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून बचाव करेल Google Maps चं 'हे' फीचर

वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून बचाव करेल Google Maps चं 'हे' फीचर

गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यासाठी स्मार्टफोनची मदत होऊ शकते. ओव्हर स्पीडिंगपासून वाचण्यासाठी Google Maps च्या मदतीने चलान कापलं जाण्यापासून बचाव होऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : गाडी चालवताना योग्य ते नियम पाळणं अत्यावश्यक आहे. वाहतुकीचा एखादा नियम मोडला तरी मोबाइलवर तुमचं चालान कापल्याचा मेसेज येतो. ही तंत्रज्ञानाचीच कमाल आहे. रस्त्यांवरही तुमच्या गाडीवर तिसऱ्या डोळ्याचं लक्ष असून एखादी चूकही कॅमेऱ्यात कैद होते. विशेषकरुन अति वेगात गाडी चालवल्याच्या अनेक घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या असून यामुळे चलान कापल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते आहे.

स्मार्टफोन करेल अलर्ट -

गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यासाठी स्मार्टफोनची मदत होऊ शकते. ओव्हर स्पीडिंगपासून वाचण्यासाठी Google Maps च्या मदतीने चलान कापलं जाण्यापासून बचाव होऊ शकतो. त्याशिवाय अपघातच्या घटनांमध्ये कमी होण्यास मदत होईल.

Google Maps चं Speedometer फीचर गाडीचा स्पीड कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करेल. गाडीचा स्पीड नियंत्रणाबाहेर जात असल्यास स्पीडोमीटर अलर्ट करतं. गाडी नियंत्रित वेगाच्या बाहेर गेल्यास हे फीचर अलर्ट करेल.

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

कसं अॅक्टिव्ह कराल Speedometer -

Speedometer फीचर अॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वात आधी Google Maps सुरू करा. आता Google Maps च्या प्रोफाइलवर क्लिक करुन सेटिंग आणि त्यानंतर Navigation Settings वर क्लिक करा. इथे Driving पर्यायात Speedometer दिसेल. हे फीचर ऑन करा.

PAN Card वरील सही-फोटो बदलायचा आहे? घरबसल्या असं करा Update

कसं काम करतं स्पीडोमीटर?

Google Maps च्या स्पीडोमीटरद्वारे तुम्ही गाडीचा वेग तपासू शकता. एका लिमिटनंतर गाडीचा स्पीड पुढे गेल्यास स्पीडोमीटरचा रंग लाल होतो. याच्या मदतीने कार चालवताना कारच्या स्पीडचा अंदाज येऊ शकतो. स्पीडोमीटरचा रंग लाल झाल्यास, तुम्हाला हा अलर्ट मिळेल आणि वेग वेळीच कमी करण्यास मदत होईल.

First published:

Tags: Car, Google, Tech news