Home /News /videsh /

याठिकाणी WhatsApp वर अशी इमोजी पाठवली तर थेट तुरुंगवारी! होऊ शकतो 20 लाखांचा दंड

याठिकाणी WhatsApp वर अशी इमोजी पाठवली तर थेट तुरुंगवारी! होऊ शकतो 20 लाखांचा दंड

सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia latest News) व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp Emoji) रेड हार्ट इमोजी (Red Heart Emoji) पाठवल्यास तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय पाठवणाऱ्याला 20 लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.

रियाध, 18 फेब्रुवारी: सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia latest News) व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp Emoji) रेड हार्ट इमोजी (Red Heart Emoji) पाठवल्यास तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय पाठवणाऱ्याला 20 लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो. जेव्हा असा मेसेज एखाद्या व्यक्तीला येईल आणि तो पोलिसांकडे तक्रार करेल तेव्हा अशी कारवाई होऊ शकते. सौदी अरेबियातील एका सायबर तज्ज्ञाने ओकाझ या वृत्तपत्राशी बोलताना अशी माहिती दिली की, सौदीच्या कायद्यानुसार मेसेज पाठवणारा दोषी आढळल्यास त्याला दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास (Imprisonment for sending heart emoji on WhatsApp) होऊ शकतो. याशिवाय असा मेसेज पाठवणाऱ्याला एक लाख सौदी रियाल इतका दंडही होऊ शकतो. भारतीय चलनाचा विचार करता ही रक्कम 20,00,000 रुपयांपेक्षा अधिक आहे. सौदी अरेबियात रेड हार्ट इमोजी पाठवणं हा आहे छळाचा गुन्हा सौदी अरेबियातील फसवणूकविरोधी संघटनेचे (Anti-Fraud Association) सदस्य अल मोआताज कुत्बी यांनी सौदी वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवणं हा छळाचा गुन्हा आहे. ऑनलाइन चॅटिंगदरम्यान, एखादा फोटो किंवा इमोजी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने एखाद्या युजरने केस दाखल केल्यास, ही बाब छळाच्या गुन्ह्याच्या श्रेणीत येईल. सौदी अरेबियात अशा गुन्ह्यांसाठी 'झीरो टॉलरन्स' हे धोरण आहे. हे वाचा-ब्रिटनच्या प्रिन्सवर बलात्काराचा आरोप करणारी Virginia पुन्हा चर्चेत,वाचा सविस्तर सौदीमध्ये आहेत सोशल मीडिया वापरासाठी कडक कायदे दोघांच्या संभाषणात बळजबरीने हस्तक्षेप करण्याबाबत किंवा भावना दुखावणारे फोटोज अथवा इमोजी शेअर करण्याबाबत कुत्बी यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरील युजर्सना कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, की, सोशल मीडिया युजर्सनी समोरील व्यक्तीच्या भावना जाणून घेतल्याशिवाय रेड हार्ट इमोजी पाठवणं टाळावं. सौदी अरेबियाच्या अँटिहॅरॅसमेंट सिस्टीमनुसार, (Anti Harassment System) एखादं सूचक विधान, कृती किंवा हावभाव हे छळवणूक मानले जातील. यामध्ये रेड हार्ट इमोजीचा संबंध लैंगिक स्वरूपाच्या गुन्ह्यांशी जोडण्यात आला आहे. हे वाचा-इथले लोक घरातच ठेवतात जवळच्या व्यक्तींचे मृतदेह; दररोज दिलं जात गरमागरम जेवण पहिल्या गुन्ह्यासाठी ठोठावला जाणार 20 लाखांचा दंड अल मोआताज कुत्बी यांनी सांगितलं की, असा मेसेज प्राप्त करणाऱ्या युजरने तक्रार नोंदवली आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला, तर मेसेज पाठवणारा अडचणीत येऊ शकतो. या प्रकरणात दोषीला 1,00,000 सौदी रियालपेक्षा जास्त दंड किंवा दोन वर्ष तुरुंगवास अथवा या दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात. जर तोच युजर वारंवार या नियमाचं उल्लंघन करताना पकडला गेला तर त्याला 3,00,000 सौदी रियाल इतका दंड किंवा पाच वर्षांचा तुरुंगवास अथवा या दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात.
First published:

Tags: Saudi arabia, Whatsapp

पुढील बातम्या