• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • KooKiyaKya : KooApp वर वाढतेय ही भाषा बोलणाऱ्यांची गर्दी; 50 टक्यांपेक्षा अधिक यूजर्स हे त्याच भाषेचे...

KooKiyaKya : KooApp वर वाढतेय ही भाषा बोलणाऱ्यांची गर्दी; 50 टक्यांपेक्षा अधिक यूजर्स हे त्याच भाषेचे...

भारतात सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरच्या भाऊगर्दीत आता कू अॅपनेही आपली जागा निर्माण करायला सुरूवात केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारतात सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरच्या भाऊगर्दीत आता कू अॅपनेही आपली जागा निर्माण करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरी जेव्हा ट्विटर आणि केंद्र सरकारचा वाद विकोपाला पोहचला होता तेव्हा अनेकांनी ट्विटरचा निषेध करत कू अॅपवर (KOO micro-blogging app) आपलं अकाऊंट उघडणं पसंत केलं होतं. परंतु आता कू (KOO App) अॅप चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे. कारण कू अॅपवर आता भारतातील लोकांची उपस्थिती सातत्यानं वाढताना दिसत आहे. त्यातच आता कू अॅप वापरणाऱ्यांमध्ये हिंदी भाषिकांचं प्रमाण हे सर्वाधिक (Hindi users increasing on Koo App) असल्याची माहिती समोर आली आहे. जगभरात हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही 60 कोटींच्या आसपास असल्याने या भाषिकांच्या संवादाचा स्पेस भरून काढण्यासाठी कू अॅप प्रभावी ठरताना दिसत आहे. WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक? कारण कू अॅप हा भारतातील सर्वात मोठा आणि पहिला माइक्रो-ब्लॉगिंग अॅप आहे. त्यामुळं आता इतर भाषांचेही यूजर्स कू अॅपवर येत आहेत. कू अॅपने भारतातील प्रत्येक व्यक्तीला विचारात घेता प्रत्येक मातृभाषेत अॅपला डेवोलोप केलं आहे. त्यामुळं बहुभाषिक समाजरचना असलेल्या भारत देशामध्ये कू अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

  Twitter : ट्विटर करतोय उजव्या विचारांच्या ट्विटर हॅडल्सला प्रमोट; संशोधनातून माहिती आली समोर

  देशात घडणाऱ्या दैनंदिव सोशल घडामोडी विचारात घेऊन कू अॅपला डेवेलोप करण्यात (KooKiyaKya) आलं आहे. त्यातच आता भारत आणि पाकिस्तान च्या मॅचसाठी ही क्रिकेट केंद्रित अभियान राबवला जात आहे. 2021 च्या शेवटपर्यंत जगात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे हिंदी भाषा बोलणाऱ्यांचं असणार आहे. त्यामुळं कू अॅपवर असलेल्या या 60 कोटी हिंदी भाषिक लोकांचा समूह त्यादृष्टीनं वाटचाल करताना दिसत आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: