मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

या 6 गोष्टी लक्षात ठेवून दिवाळीत करा Smart Shopping, फसव्या ऑफर्स आणि कर्जापासून राहाल दूर

या 6 गोष्टी लक्षात ठेवून दिवाळीत करा Smart Shopping, फसव्या ऑफर्स आणि कर्जापासून राहाल दूर

अनेकदा ऑफर्सच्या अमिषाला बळी पडून मोठा झटका बसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळातील ऑफर्समध्ये खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

अनेकदा ऑफर्सच्या अमिषाला बळी पडून मोठा झटका बसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळातील ऑफर्समध्ये खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

अनेकदा ऑफर्सच्या अमिषाला बळी पडून मोठा झटका बसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळातील ऑफर्समध्ये खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : आज (2 नोव्हेंबर 2021) देशभरात धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. सणासुदीचा काळ म्हणजे खरेदीसाठी सुवर्णसंधी मानली जाते. या काळात ग्राहकांसोबत विक्रेतेदेखील खूश असतात. अगदी गणपती आणि नवरात्री उत्सवापासूनच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खरेदीच्या ऑफर (Offer) सुरू होतात. सध्या, Amazon, Flipkart, Reliance Digital, Tata Cliq या ई-कॉमर्स अॅप्सवर अनेक ऑफर सुरू आहेत. याशिवाय ऑफलाइन आउटलेट्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर दिल्या आहेत. पण ऑफर्सच्या अमिषाला बळी मोठा झटका बसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळातील ऑफर्समध्ये खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं बजेट ठरवा आणि त्याचं पालन करा - भावनेच्या भरात होणारा अतिरिक्त खर्च टाळणं, ही स्मार्ट शॉपिंगमधील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. शॉपिंगला जाण्यापूर्वी तुम्ही सणासुदीच्या काळात किती खर्च करू शकता याचा आढावा घ्या आणि त्यानंतर शॉपिंगसाठी ठराविक बजेट निश्चत करा. साधारणपणे, मासिक उत्पन्नापैकी 5 टक्के रक्कम सणासुदीच्या खरेदीवर खर्च करणं योग्य मानलं जातं. तुम्ही एकूण मासिक उत्पन्नातील 10 टक्के रक्कम देखील खर्च करू शकता. त्यानंतर मात्र, तुम्हाला इतर खर्चांवर कटाक्षाने नियंत्रण ठेवावं लागेल, असं फायनान्शियल एड्युकेटर आणि मनी मेंटॉर अँड फिनसेफ इंडियाचे संस्थापक मृण अग्रवाल यांनी म्हटलं आहे. शॉपिंग ऑफर्स (Shopping offers) समजून घ्या - ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट आणि किरकोळ विक्रेते सणासुदीच्या काळात अनेक शॉपिंग ऑफर देतात. Buy 2 Get 1 Free, Cashback, जास्त किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर विविध गोष्टी फ्री मिळवा, या लोकप्रिय ऑफर आहेत. या ऑफर्सचा लाभ घेण्यापूर्वी त्या तपशीलवार समजून घेणं गरजेचं आहे. कारण, अनेकदा ऑफर्ससोबत काही अटी आणि शर्ती देखील दिलेल्या असतात. आपण खरेदीपूर्वी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मिळत असलेल्या ऑफरमध्ये खरोखर चांगली सूट मिळत आहे का, हे पाहण्यासाठी त्या वस्तूची मूळ किंमत नक्की तपासून पहा. याशिवाय एखादी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी तुम्ही विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर त्या किमतीची तुलना करून पाहू शकता, असा सल्ला बँक बाझारचे सीईओ अधिल शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी यांच्या मते, मिळत असलेला डिस्काउंट वस्तूच्या जुन्या मॉडेल रेंजवर किंवा कपड्यांच्या आउटडेट लाईनवर तर दिला जात नाही ना? हे सुद्धा नक्की तपासून पाहिलं पाहिजे. Cashback Offers आपल्याला चांगल्या वाटतात. परंतु सहसा जास्त रकमेच्या खरेदीवर या ऑफर्स दिल्या जातात. रिटेल आउटलेटवर 10 टक्के कॅशबॅक असू शकतो. अशा स्थितीत जास्तीत जास्त 2 हजार रुपयांपर्यंतच कॅशबॅक मिळू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20 हजार रुपये खर्च केले तर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक (Cashback) मिळेल, अशी ऑफर आहे. अशा ठिकाणी जर तुम्ही 40 हजार रुपये खर्च केले तरी तुम्हाला 10 टक्केच कॅशबॅक मिळतो. म्हणजे प्रत्यक्षात 20 हजार रुपयांवर फक्त 5 टक्के कॅशबॅक मिळेल. म्हणून, व्यवस्थित आकडेमोड करूनच कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घ्यायचा की नाही ते ठरवा. याशिवाय, खरेदी सोबत मिळणाऱ्या फ्री वस्तू तुम्हाला गरज नसलेल्या किंवा वापरत नसलेल्या असतील तर त्या निरुपयोगीच ठरतात, असं देखील शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

दिवाळीत Online Shopping करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवाच...

रिटेलर्सकडून खरेदी करताना जास्त डिस्काउंट मागा - किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करताना, तुम्हाला वस्तू प्रत्यक्ष हाताळता येते. अशा वेळी तुम्ही वस्तूची चाचणी घेऊ शकता आणि तिची स्टोअरमधील इतर ब्रँडशी तुलना सुद्धा करता येते. याशिवाय तुम्हाला तिच्या वॉरंटी अटीदेखील व्यवस्थित समजतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ किमतीवर बार्गेनिंग करता येतात. जर तुम्ही दुकानदाराशी योग्यरित्या बार्गेनिंग केलं, तर तुम्हाला 10 ते 15 अतिरिक्त सूट मिळू शकते, असं माय मनी मंत्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक राज खोसला यांनी सांगितलं. तुम्ही जास्त किमतीची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किरकोळ विक्रेत्याकडून खरेदी करणं जास्त फायद्याचं ठरेल. कारण, तिथे किमतीबाबत बार्गेनिंग करता येतात. बार्गेनिंग झाल्यानंतर पेमेंटपूर्वी त्याची ई-कॉमर्स वेबसाइटशी तुलना करणंसुद्धा शक्य होतं. 'माझा सल्ला असा आहे की, ऑफरचा अभ्यास करा. तुम्ही निवडलेल्या पेमेंटच्या पद्धतीनुसार अटी व शर्ती समजून घ्या. किरकोळ विक्रेत्याशी प्रॉडक्टच्या किमतीबाबत बार्गेनिंग करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल', असं खोसला म्हणाले. zero-cost EMI ऑफर काळजीपूर्व अभ्यासा - किरकोळ विक्रेते आणि ई-कॉमर्स वेबसाइट्स ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, रेडिमेड कपडे आणि इतर अनेक उत्पादनांच्या खरेदीवर zero-cost EMI ऑफर देतात. no-cost EMI, एकाच वेळी तुमच्या खिश्यातून मोठी रक्कम जाण्यापासून वाचवू शकतात. मात्र, ते नेहमीच 'नो-कॉस्ट' असतीलच असं नाही. नो कॉस्टच्या प्रक्रियेमध्ये कधी-कधी तुम्हाला पैसेदेखील मोजावे लागू शकतात. ज्यामुळे उत्पादनाची एकूण किंमत वाढते, असं बँक बाझारचे सीईओ अधिल शेट्टी यांनी सांगितलं. याबाबत माय मनी मंत्राच्या राज खोसला यांनीदेखील आपलं मत मांडलं. इतर कोणत्याही कर्जाप्रमाणं, नो-कॉस्ट ईएमआयवर उत्पादन खरेदी करताना दिलेल्या वेळेत रकमेची पूर्ण परतफेड करणं आवश्यक आहे. असं न झाल्यास, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. कदाचित तुम्हाला पुन्हा क्रेडिट मिळवण्यास अडचणसुद्धा येऊ शकते. जर तुम्ही रोख रक्कम देऊन खरेदी करू शकत नसाल, तरच no-cost EMI चा लाभ घ्या, असे खोसला म्हणाले. 'Buy Now Pay Later' स्किम्सपासून दूर रहा - ‘Buy Now Pay Later’ म्हणजेच आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या (BNPL) ही फिनटेक फर्मनं ग्राहकांना दिलेली वैयक्तिक कर्ज योजनाच आहे. या योजनेमध्ये, तुमची सर्व खरेदी एकाच बिलिंग-सायकलमध्ये जोडली जाते. तुम्ही नंतर पैसे देऊन हे बिल Nill करू शकता. तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी फिनटेक फर्म अतिरिक्त सवलती, कॅशबॅक ऑफर आणि लॉयल्टी बेनिफिट्सदेखील देऊ करतात. बहुतेक BNPL स्किम्स परतफेड करण्यासाठी 14 ते 45 दिवसांचा कालावधी देतात. या कालावधीत बिलावर व्याज लावलं जात नाही. परंतु काही वेळा ईएमआय ऑप्शन्सवर अतिरिक्त व्याज द्यावं लागतं. त्यामुळे सणासुदीच्या काळात क्रेडिट सुविधांचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. फ्लिपकार्ट पे लेटरच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या खरेदीचं बिल भरण्याच्या तारखेपूर्वी पैशांची जुळवाजुळव करून ठेवा. तुम्ही बिलाची तारीख चुकवलीत आणि पैसे द्यायला उशीर झाला, तर ही सेवा विलंबशुल्कापोटी 600 रुपये आणि कन्व्हिनियन्स फी म्हणून 475 रुपये असा दंड पुढच्या महिन्याच्या बिलात आकारते. आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या (BNPL) या योजनेतील इतर अर्थ पुरवठादार कंपन्याही अशाच पद्धतीचं विलंबशुल्क आणि इतर शुल्क आकारतात. त्यामुळे सवलतीऐवजी भुर्दंडच जबरदस्त होऊ शकतो. फिनटेक कंपन्यांनी ऑफर केलेल्या अशा फायनान्स स्किमचा पहिल्यांदा लाभ घेणारे अनेक ग्राहक कर्जाच्या सापळ्यात अडकतात. 'ग्राहकांनी अशा ठिकाणांवरून कर्ज घेण्यापूर्वी त्यांची पडताळणी करून घेतली पाहिजे. फिनटेक कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे पॅकेजिंग करून आपल्याला जास्त दरात कर्ज तर नाही ना देत हे पाहिलं पाहिजे. याशिवाय ते असुरक्षित आहे का हे सुद्धा पाहून घ्या, अशा सूचना rectifycredit.com च्या संस्थापक संचालक अपर्णा रामचंद्र यांनी दिल्या आहेत.

दिवाळीत Car खरेदी करायची आहे, पण बजेट नाहीये? ही कंपनी देतेय 1 लाखांपर्यंतची सूट

अतिरिक्त ऑफर आणि रिवॉर्ड मिळविण्यासाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड वापरा - तुम्ही नियमितपणे फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून खरेदी करत असाल तर, तुम्हाला को-ब्रँडेड क्रेडिट कार्डबद्दल नक्की माहिती असेल. फ्लिपकार्ट किंवा अमेझॉननं अनेक बँकांशी टायअप केलेलं आहे. त्या बँकाचे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला अधिक सूट, कॅशबॅक आणि रिवॉर्ड मिळतात. सध्या स्मार्टफोनसारखी जास्त किमतीची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं ठराविक बँकांचं क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास त्यावर आकर्षक कॅशबॅक आणि सूट मिळते. मात्र, अशी खरेदी करतानासुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. को-ब्रँडेड क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करताना युटिलायझेशन रेट 30 टक्क्यांच्या खाली ठेवा आणि लवकर त्याची परतफेड करा, असा सल्ला अधिल शेट्टी यांनी दिला आहे. दिवाळीची खरेदी करताना, वर्षभरात जमा झालेले तुमचे क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट रिडिम करायला विसरू नका. तुमच्या जवळच्या लोकांसाठी भेटवस्तू किंवा स्वत:साठी खरेदी करताना तुमचे शॉपिंग पॉइंट आठवणीनं तपासा. तसंच, डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं खरेदी करताना तुम्ही लॉयल्टी पॉइंट्स किंवा डिस्काउंट कूपन वापरू शकता का, हे तपासण्याचा सल्ला राज खोसला यांनी दिला आहे. सणासुदीच्या काळात शॉपिंग करताना वरील सर्व गोष्टींची काळजी घेतली तर, अतिरिक्त खर्च, कर्ज आणि फसवणुकीसारख्या गोष्टींपासून तुमचा बचाव होऊ शकतो आणि दिवाळी आनंदात जाऊ शकते.
First published:

Tags: Online shopping, Shopping

पुढील बातम्या