जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone Tips : Charging नंतरही मोबाइल जास्त वेळ चालत नाही? असं वाढवा Battery लाइफ

Smartphone Tips : Charging नंतरही मोबाइल जास्त वेळ चालत नाही? असं वाढवा Battery लाइफ

Smartphone Tips : Charging नंतरही मोबाइल जास्त वेळ चालत नाही? असं वाढवा Battery लाइफ

अनेकदा स्मार्टफोनचा वापर करत असताना नीट काम करत नाही किंवा त्याची बॅटरी लवकर संपते. अशावेळी काही टिप्सद्वारे स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. अनेक लोकांची बहुतेक कामं ही मोबाइलवरच पूर्ण होत आहेत. विशेषत: कोरोना काळात स्मार्टफोन्सचा वापर ऑफिशियल कामांसाठी वाढत गेला. परंतु अनेकदा स्मार्टफोनचा वापर करत असताना नीट काम करत नाही किंवा त्याची (Mobile not working even after full charging) बॅटरी लवकर संपते. अशावेळी युजर्सला मोठा मनस्ताप होत असतो. परंतु काही टिप्सद्वारे स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढू शकते. जेव्हा स्मार्टफोन खरेदी करतो त्यावेळी संबंधित कंपनीकडून बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी (Smartphone Tips) काही सूचना देण्यात आलेल्या असतात. त्याचं वेळोवेळी पालन केलं, तर युजर्सला बॅटरी लाइफ सोबतच स्मार्टफोनची सुरक्षितताही निश्चित करता येऊ शकते.

JioPhone Next चं बुकिंग सुरू, तीनप्रकारे बुक करू शकता सर्वात स्वस्त Smartphone

अशी वाढवा बॅटरी लाइफ - - स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हरचा योग्य वापर करायला हवा - मोबाइलमधील ब्राइटनेस नेहमी कमी ठेवायला हवा, त्याचबरोबर ब्राइटनेस सेटिंग ऑटो मोडवर असावी - मोबाईलमधील किपॅडचा आवाज आणि व्हायब्रेशनला बंद करा - जास्त चार्जिंगचा वापर होईल असे Apps  वापरू नका - शक्य झाल्यास पावर Adaptor चा वापर करा

डेटा सुरक्षेसाठी Facebook आणि Instagram ची मोठी कारवाई; हटवला ‘तो’ कंटेंट

त्याचबरोबर मोबाइलचा अतिवापर झाला, तर तो गरम व्हायला लागतो. त्यामुळे स्मार्टफोनवर सतत गेम्स खेळणं किंवा जास्त वेळ Video पाहणं टाळायला हवं. विशेष म्हणजे मोबाइलचं चार्जिंग चालू असताना (phone keeps dying when fully charged) त्याचा वापर करू नये. कारण त्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीला धोका असतो. त्याचबरोबर दिवसभरात जितक्या चार्जिंगची आवश्यकता आहे, तितकाच फोन चार्ज करा. फोन ओव्हरचार्ज करू नका. त्यामुळे मोबाइलची बॅटरी लाइफ वाढत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात