नवी दिल्ली, 11 जून: व्हॉट्सअॅप जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. जगभरातील प्रत्येक ठिकाणी दररोज लाखो-करोडो मेसेज होत असतील. अशात व्हॉट्सअॅप हे सर्व मेसेज सुरक्षित कसे ठेवता असा प्रश्न पडतो. कंपनीने ते कोणाचेही खासही मेसेज वाचू शकत नसल्याचं सांगितलं आहे, कारण युजर्सचे मेसेजेस इनक्रिप्टेड (Encrypted) असतात. हे मेसेज एंड-टू-एंड (end-to-end) युजरलाच पाहता येतात. तरीदेखील चॅट लीक झाल्याचं अनेकदा ऐकिवात येतं. मेसेज इनक्रिप्टेड असतानाही WhatsApp Chats लीक कसे होतात?
Google Drive Backup -
WhatsApp Chats चा बॅकअप गुगल ड्राईव्हवर जातो. युजर स्वत: आपल्या Email ID ने याला लिंक करू शकतात. WhatsApp च्या चॅट बॅकअप सेटिंग्समध्ये हे पाहता येतं. अधिकतर युजर्स चॅटचा Auto बॅकअप ठेवतात, जेणेकरुन वेळोवेळी चॅट्सचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये जाईल. यामुळे जुने चॅट्स शोधण्यास आणि फोन बदलल्यानंतर ते रिस्टोर करण्यास मदत होते. परंतु मेसेज, चॅट लीक होण्यामागे हेच कारण आहे.
End-to-end encrypted -
व्हॉट्सअॅप चॅट्स End-to-end encrypted आहेत. पण गुगल ड्राईव्हवर जे चॅट बॅकअप होतात, ते End-to-end encrypted नाहीत. चॅटमध्ये जे काही फोटो, व्हिडीओ असतील, ते सर्व गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतात. जर युजरचं Gmail Account अॅक्सेस केलं, तर अनेक चॅट हिस्ट्री आणि बॅकअपसह फोटोही मिळतील. अनेक प्रकरणात हीच बाब समोर आली आहे, की चॅट बॅकअपमुळे प्रायव्हेट फोटो किंवा चॅट लीक झाले आहेत.
WhatsApp ने ते कोणत्याही युजर्सचे चॅट वाचत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच युजर्सचं चॅट End-to-end encrypted मुळे सेफ, सुरक्षित राहत असल्याचाही दावा व्हॉट्सअॅपने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp chats