मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? शोधा ही ट्रिक वापरून

तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? शोधा ही ट्रिक वापरून

Whatsapp च्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स असतात. कित्येक यूझर्सना या ट्रिक्स माहिती नसतात. यातीलच एक ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Whatsapp च्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स असतात. कित्येक यूझर्सना या ट्रिक्स माहिती नसतात. यातीलच एक ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Whatsapp च्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स असतात. कित्येक यूझर्सना या ट्रिक्स माहिती नसतात. यातीलच एक ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  नवी दिल्ली, 17 जुलै: जगातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय मेसेजिंग अप म्हणजे व्हॉट्सॲप (WhatsApp). केवळ टेक्स्ट मेसेजच नाही, तर फोटो-व्हिडिओ, ऑडिओ, डॉक्युमेंट्स अशा गोष्टीही व्हॉट्सॲपवरुन आपल्याला एकमेकांना पाठवता येतात. यासोबतच व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल आणि आता तर पैसेही पाठवण्याची सुविधा व्हॉट्सॲपवर (Whatsapp new chatting feature) उपलब्ध आहे. यासोबतच आपल्या यूझर्सना व्हॉट्सॲप वेळोवेळी नवनवीन फीचर्सही (WhatsApp New Features) देत असतं. या फीचर्सव्यतिरिक्तही व्हॉट्सॲपच्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स असतात (WhatsApp tips and tricks). कित्येक यूझर्सना या ट्रिक्स माहिती नसतात. यातीलच एक ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का, की तुमचा पार्टनर व्हॉट्सॲपवर कोणाशी जास्त गप्पा मारतो? आम्ही आज जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, त्या ट्रिकच्या मदतीने तुमचा पार्टनर व्हॉट्सॲपवर कोणाशी सगळ्यात जास्त चॅटिंग करतो हे तुम्हाला कळू शकणार आहे (WhatsApp Hack tricks). यासोबतच, तुम्ही किती टेक्स मेसेज पाठवले आणि रिसिव्ह केले हेदेखील तुम्हाला समजणार आहे. तसेच, शेअर केलेल्या मीडिया फाईल्सबाबतही माहिती मिळू शकते (WhatsApp shared files).

  Right to Love चा कुटुंबाकडून विरोध;12वीच्या विद्यार्थिनीचं उचललं धक्कादायक पाऊल

  तसेच, खास बाब म्हणजे कोणत्या कॉन्टॅक्ट सोबत झालेलं चॅटिंग तुमच्या फोनच्या स्टोरेजमधील अधिक जागा घेत आहे हेदेखील तुम्हाला या ट्रिकच्या मदतीने समजू शकेल. झी न्यूजने याबाबतची माहिती शेअर केली आहे.

  अशी वापरा ट्रिक

  सर्वात अगोदर व्हॉट्सॲप सुरू करा.

  यानंतर सेटिंग्ज टॅब उघडा.

  यामध्ये डेटा अँड स्टोरेज पर्याय निवडा.

  यामध्ये स्टोरेज यूसेज पर्यायावर क्लिक करा.

  यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि चॅटची यादी दिसेल.

  या यादीमध्ये सगळ्यात जास्त स्टोरेज वापरणारं कॉन्टॅक्ट सगळ्यात वर दिसेल.

  तुम्हालाही आहे पैशांची आवश्यकता? याठिकाणी मिनिटांमध्ये मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज

  या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास तुम्हाला शेअर केलेल्या चॅटिंगची आणि मीडिया फाईल्सची माहिती मिळेल.

  यातून मग तुम्हाला तुम्ही कोणाशी सर्वाधिक बोलत आहात, कोणासोबत तुम्ही सर्वाधिक मीडिया शेअर करत आहात याची सगळी माहिती मिळू शकेल. तसेच, तुमच्या पार्टनरच्या फोनमध्ये ही ट्रिक वापरली, तर तुमचा पार्टनर कोणाशी सर्वाधिक बोलत आहे किंवा मीडिया शेअर करत आहे हेदेखील तुम्हाला आरामात कळू शकेल. तुम्हाला कळालेली ही ट्रिक आपल्या पार्टनरसोबत मात्र शेअर करू नका, नाहीतर तुमचीच आयडिया तुमच्यावर वापरली जाण्याची शक्यता आहे.

  First published:

  Tags: Whatsapp