नवी दिल्ली, 26 मे : हॅकिंगचा धोका सतत वाढतो आहे. युजर्सची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नवनव्या पद्धतींचा वापर करतात. WhatsApp सिक्योरिटी तोडून हॅकर्स अकाउंटही अॅक्सेस करू शकतात. CloudSEk चे CEO आणि फाउंडर Rahul Sasi ने याबाबत माहिती दिली आहे. हॅकर्सने आता एक नवी पद्धत शोधली असून ते यामुळे युजर्सच्या अकाउंटमध्ये अॅक्सेस करू शकतात. त्यांच्या एका लहानशा ट्रिकमुळे WhatsApp Account हॅक केलं जाऊ शकतं.
या स्कॅममध्ये युजरला हॅकरचा कॉल येतो आणि युजरला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यासाठी सांगितलं जातं. जर युजरने नंबर डायल केला, तर हॅकर सहजपणे युजरच्या अकाउंटमध्ये अॅक्सेस मिळवू शकतो.
हॅक करण्यासाठी हॅकर युजरला कॉल करतो आणि त्यांना **67*<10 डिजिट नंबर > किंवा *405*<10 डिजिट नंबर डायल करण्यासाठी सांगितलं जातं.
जर युजरने चुकूनही यावर कॉल केला, तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि WhatsApp Account चा अॅक्सेस हॅकर्सकडे जाईल. अॅक्सेस मिळाल्यानंतर हॅकर्स युजरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या लोकांकडून पैसे मागतात. काही जण पैसे देतात तर काही जणांनी विचारपूस केल्यास या हॅकबाबत युजरला माहिती मिळते.
कसं सुरक्षित ठेवाल अकाउंट -
जर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सर्विस प्रोव्हाइडरच्या नावाने 67 किंवा 405 वरुन सुरू होणाऱ्या नंबरवर कॉल करण्यासाठी सांगितल्यास चुकूनही कॉल करू नका. तसंच अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या WhatsApp Account वर Two Step Verification ऑन करा आणि लॉगइन करण्यासाठी पासवर्ड किंवा पीन सेट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp messages, Whatsapp New Feature, WhatsApp user