जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google ने भारतात लाँच केलं Job Search App, नोकरी शोधण्यासाठी होईल मदत

Google ने भारतात लाँच केलं Job Search App, नोकरी शोधण्यासाठी होईल मदत

Google ने भारतात लाँच केलं Job Search App, नोकरी शोधण्यासाठी होईल मदत

कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर अनेक भारतीय नव्या नोकरीच्या शोधात आहेत. अशा स्थितीत आता नवी नोकरी शोधणं अधिक सोपं होऊ शकतं. Google ने आपलं जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतातही लाँच केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जून: कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली. नोकरी गेल्यानंतर अनेक भारतीय नव्या नोकरीच्या शोधात आहेत. अशा स्थितीत आता नवी नोकरी शोधणं अधिक सोपं होऊ शकतं. Google ने आपलं जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतातही लाँच केलं आहे. कॉर्मो (Karmo) असं या जॉब सर्च अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप भारतात अनेक तरुणांसाठी एन्ट्री लेवल जॉब शोधण्यासाठी मदतशीर ठरू शकतं. टेक क्रंचनुसार, गुगलने भारतात कॉर्मो जॉब्स आपल्या पेमेंट अ‍ॅप्लिकेशन गुगल पेमध्ये जॉब्स स्पॉटमध्ये जोडलं आहे. भारतात हे जॉब्स स्पॉट कॉर्मो जॉब्स रुपात दाखल केले जातील. गुगलने हे अ‍ॅप बांगलादेशात लाँच केलं आहे. त्यानंतर इंडोनेशियामध्येही हे लाँच झालं आहे. त्यानंतर आता कॉर्मो अ‍ॅप भारतातही आणण्यात आलं आहे. (वाचा -  Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका ) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हापासून हे अ‍ॅप गुगल पेद्वारे लाँच करण्यात आलं आहे, तेव्हापासून Zomato, Dunzo सह अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. (वाचा -  Private Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात? या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती ) हे अ‍ॅप युजर्सला केवळ एन्ट्री लेवल जॉब्स शोधण्यासाठी मदत करत नाही, तर रेज्युमे, CV बनवण्यासाठी आणि इतर अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत करतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात