मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /हिवाळ्यात बाईक आणि स्कूटरला चार्ज करताना प्रॉब्लेम येतोय? या Tips वापरून झटपट करा Start

हिवाळ्यात बाईक आणि स्कूटरला चार्ज करताना प्रॉब्लेम येतोय? या Tips वापरून झटपट करा Start

अनेकदा हिवाळ्यात लोक टू -व्‍हीलर वाहन फारसे वापरत नाही. अशावेळी इंजिन फार दिवस बंद पडल्यामुळं तो खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याचा नियमितरित्या वापर करायला हवा

अनेकदा हिवाळ्यात लोक टू -व्‍हीलर वाहन फारसे वापरत नाही. अशावेळी इंजिन फार दिवस बंद पडल्यामुळं तो खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याचा नियमितरित्या वापर करायला हवा

अनेकदा हिवाळ्यात लोक टू -व्‍हीलर वाहन फारसे वापरत नाही. अशावेळी इंजिन फार दिवस बंद पडल्यामुळं तो खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याचा नियमितरित्या वापर करायला हवा

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : हिवाळ्याच्या हंगामात बाईक आणि स्कूटर सकाळी लवकर चालू होत नाही. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांनाही चार्ज करण्यासाठी समस्या येत असते. त्यासाठी अनेकांना फार कष्ट घ्यावं लागतं. आणि जर महत्त्वाच्या कामासाठी लोकांना लवकर बाहेर जायचं असेल तर अशावेळी (bike hard to start when cold) मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यामुळं आता या समस्यांवर कशी मात करावी आणि हिवाळ्यात (bike is not starting in morning) बाईक आणि स्कूटरची काळजी कशी निगा राखायला हवी याविषयी काही टिप्स जाणून घेऊयात.

इंजिन कायम बंद पडू देऊ नका.

अनेकदा हिवाळ्यात लोक टू -व्‍हीलर वाहन फारसे वापरत नाही. अशावेळी इंजिन फार दिवस बंद पडल्यामुळं तो खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याचा नियमितरित्या वापर करायला हवा. कुठे प्रवास करायचा नसेल तरीही दुपारी काही वेळ इंजिनला चालू करायला हवं.

आता प्रत्यक्षात येतेय हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचाही हातभार

इंजिनचं Oil वेळेवर बदलत रहा.

बाईक किंवा स्कूटरचा वापर करत असताना त्याच्या इंजिनमधील Oil चा वापर फार फार तर दोन ते तीन महिने केला पाहिजे. त्यासाठी वाहनाचा वापर करत असताना इंजिनचं Oil वेळेनुसार आणि गरजेनुसार बदलत रहायला हवं. कारण फार दिवस इंजिनमध्ये Oil राहिलं तर ते पातळ होते ज्यामुळं इंजिनला त्यापासून धोका असतो.

Hero Electric चा मोठा निर्णय; देशभर 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार

किक-स्टार्टचा वापर करा.

हिवाळ्यात बाईक किंवा स्कूटरला स्टार्ट करताना त्याला किकने स्टार्ट करायला हवं. अनेकदा सेल्फ स्टार्टचा वापर लोक टू व्हिलरला चालू करण्यासाठी करत असतात. परंतु त्यामुळं समस्या निर्माण होऊ शकते.

2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात? पाहा काय आहे योजना...

स्पार्क प्लगची नेहमी सफाई करायला हवी.

स्पार्क प्लग हे कोणत्याही टू व्हिलरसाठी महत्त्वाचा भाग आहे. कारण बाईक स्टार्ट करण्यामागे त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यासाठी नियमित सर्वेसिंग करताना स्पार्क प्लगला साफ करायला हवं आणि विशेषत: हिवाळ्यात याची योग्य काळजी घ्यायला हवी.

कारमध्ये हेडफोनशिवाय ऐकता येणार Music; तरीही दुसऱ्यांना होणार नाही डिस्टर्ब

बॅटरी नेहमी चार्ज ठेवायला हवी.

टू व्हिलर वाहनाला स्टार्ट करण्यामध्ये बॅटरीची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळं बॅटरीची (Trouble charging motorcycles and scooters during winter) स्थिती नेहमी तपासत रहायला हवी. त्याचबरोबर ती खराब झाली असेल तर त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करायला हवी.

First published:

Tags: Bike riding, Winter