आताच डिलीट करा ‘हे’ धोकादायक 46 अ‍ॅप, Googleने जाहीर केली यादी

आताच डिलीट करा ‘हे’ धोकादायक 46 अ‍ॅप, Googleने जाहीर केली यादी

तुमच्या रोजच्या वापरातले हे 46 अ‍ॅप धोकादायक, आताच करा डिलीट.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : गुगलने मागच्या आठवड्यात प्ले स्टोअरमधून 46 अ‍ॅप हटवले आहे. हे 46 अ‍ॅप iHandy नावाच्या चायना डेव्लपरनं तयार केले होते. हे अ‍ॅप हटवकाना Googleने कोणते स्पष्ट कारण दिले नसले तरी, हे अ‍ॅप फोनसाठी खतरनाक ठरू शकतात. या अ‍ॅपवर युझर्सना भ्रामक जाहीराती दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, गुगलनं पहिल्यांदा अशी यादी जाहीर केलेली नाही. याआधी चायना डेव्हलपरनं तयार केलेल्या अनेक अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती. बजफिडनं दिलेल्या माहितीनुसार गुगलनं जाहीर केलेल्या धोकादायक अ‍ॅपच्या यादीत सेल्फी, सुरक्षा आणि अ‍ॅटीव्हायरस, किबोर्ड, राशिफळ, इमोजी आणि आरोग्य यासंबंधी अ‍ॅप हटवण्यात आले आहेत. दरम्यान या यादीमध्ये प्रसिध्द अशा स्वीट कॅमेरा, सेल्फी ब्युटी कॅमेरा, फिल्टक असे अ‍ॅपही काढून टाकले आहे. हे प्रसिध्द अ‍ॅप जवळजवळ 50 लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले होते. दरम्यान iHandyनं तयार केलेले 8 अ‍ॅप अजूनही प्ले स्टोअरमध्ये कायम आहेत.

वाचा-WhatsApp युझर्ससाठी मोठी बातमी! आता काही स्मार्टफोनमध्ये नाही चालणार अ‍ॅप

वाचा-Apple iPhoneला तगडी स्पर्धा! 4 कॅमेरावाला फोन फक्त 7, 999 रुपयांना

iHandyचे प्रमुख व्हाईस सायमन झू (Simon Zhu) ने बजफीडशी बोलताना, “आम्ही Googleशी संपर्कात आहोत. आम्ही तयार केलेल्या अ‍ॅपवर गुगलनं अशी कारवाई का केली आहे, याची चौकशी केली जाईल. त्यानंतर अ‍ॅप सुरक्षिक आहेत की नाही, हे ठरवले जाणार आहे”, असे सांगितले.

याआधी ऑगस्ट 2019मध्ये गुगलनं (Google)ने प्ले स्टोअरमधून 85 अ‍ॅप हटवले होते. गुगलनं हे अ‍ॅप अ‍ॅडवेयरमध्ये शोधले होते. गुगलच्या रिसर्च कंपनीनं या अ‍ॅपमध्ये फोटोग्राफीसह अनेक गेमींग अ‍ॅप असल्याचे सांगितले होते.

वाचा-फेसबुक युझर्ससाठी मोठी बातमी, पाहा तुमच्या लाइक्सचं काय होणार

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या