Apple iPhoneला तगडी स्पर्धा! 4 कॅमेरावाला फोन फक्त 7, 999 रुपयांना

Apple iPhoneला तगडी स्पर्धा! 4 कॅमेरावाला फोन फक्त 7, 999 रुपयांना

अॅपलच्या 1 लाखांच्या फोनला हॉंगकॉंगच्या कंपनीनं दिली टक्कर.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : आयफोननं काही दिवसांपूर्वी तीन कॅमरावाला फोन लॉंच केला. यामुळं मार्केटमध्ये चर्चा रंगली होती. iPhone 11 proची किंमत मात्र सामन्य माणसाच्या विचाराबाहेर आहे. iPhone 11 proसध्या बाजारात किंमत एक लाखांपर्यंत आहे. मात्र आता Apple iPhoneला स्पर्धा देण्यासाठी हॉंगकॉंगच्या एका कंपनीनं चक्क 8 हजारात चार कॅमेरावाल फोन बाजारात आणला आहे.

हॉगकॉंगची कंपनी टेक्नोनं एक नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनचे नाव आहे 'स्पार्क 4' (Spark 4). नुकत्याच या फोनला भारतात लॉंच करण्यात आले. कंपनीनं या फोनची किंमत 7 हजार 999 रुपये ठेवली आहे. ही किंमत 3 जीबी32 जीबी मॉडलला लागू असणार आहे. तर, 4 जीबी64 जीबीची किंमत 8 हजार 999 रुपये असणार आहे.

वाचा-फेसबुक युझर्ससाठी मोठी बातमी, पाहा तुमच्या लाइक्सचं काय होणार

या फोनमध्ये 6.5 इंच एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे रिझोलुशन 720X1600 आहे. या डिव्हाईसमध्ये 90% स्क्रिन-टू-बॉडी रेशियो आहे.

वाचा-मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण

फोनमध्ये आहेत चार कॅमेरे

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 13 मेगापिक्सल AI प्राईमरी सेंसरवाला ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅशसह 2 एमपी सेकेंड्री कॅमराही देण्यात आला आहे. याशिवाय यात थर्ड लो-लाईट कॅमरा सेंसरही देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्लॅशसह सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 एमपी कॅमरा वेगळा देण्यात आला आहे. सध्या हा फोन निळा आणि जांभळ्या रंगात मिळणार आहे. या फोनमध्ये अंड्रोइड 9.0 आहे. तर बॅटरी 4000 mAh देण्यात आली आहे.

वाचा-मंगळावर जायचं आहे? NASA देतंय बोर्डिंग पास, अशी आहे प्रक्रिया

अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 07:57 AM IST

ताज्या बातम्या