Elec-widget

फेसबुक युझर्ससाठी मोठी बातमी, पाहा तुमच्या लाइक्सचं काय होणार

फेसबुक युझर्ससाठी मोठी बातमी, पाहा तुमच्या लाइक्सचं काय होणार

फेसबुकनं घेतला हा निर्णय, तुमचं आवडतं फीचर लवकरच होणार बंद!

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर: सोशल मीडियामधील सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे फेसबुक. फेसबुकवर अगदी आपल्या छोट्या अविस्मरणीय क्षणांपासून ते तुमच्या दिनक्रमापर्यंत सर्व गोष्टी तुमच्या वॉलवर तुम्ही पोस्ट करता आणि त्यावर तुम्हाला किती लोकांनी लाईक केलं किंवा कमेंट केली हे पाहता येत. मात्र हा पर्याय कदाचित आता तुमच्या फोनमधून गायब होऊ शकतो. कारण पोस्टवरील लाईक काऊंट हटवण्याबाबत फेसबुकची टीम विचार करत आहे.

सगळ्यात पहिल्यांदा जेन मनचुंग वॉन्ग यांनी याबाबत माहिती दिली होती. सध्या त्यावर रिसर्च सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सध्या यावर ऑस्ट्रेलियामध्ये प्रायोगिक तत्वावर फेसबुकच्या टीमनं हे करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 सप्टेंबरपासून पोस्ट टाकणाऱ्या युजर्सला फक्त लाईक आणि कमेंट्सचे काऊंट दिसतील मात्र फेसबुकवर असणाऱ्या त्याचा मित्र-मैत्रिणींना लाईक्सचा काऊंट दिसणार नाही. हा प्रयोग ऑस्ट्रेलियात यशस्वी झाला तर सगळ्या देशांमध्ये सुरू करण्याचा विचार असल्याचं फेसबुकचे प्रवक्त्यांनी टेक क्रंच यांना माहिती दिली आहे.बऱ्याचदा काही युझर्स फक्त फेसबुकवर लाईक काऊंट मिळवण्याच्या दृष्टीनं पोस्ट करतात. काहीवेळा फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, फोटो शेअर केले जातात याबाबतही फेसबुक टीम काम करत असून लवकरच यावर निर्बंध घालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टेक ब्लॉगरने ट्विटरवर या फीचरची चाचणी सुरू असताना एक स्क्रीनशॉट काढला आहे. यामध्ये फोटोला किती लाइक आहेत हे दिसत नाही. सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकच्या प्रवक्त्यांनीसुद्धा मंगळवारी म्हटलं की, फेसबुक पोस्टच्या लाइकची संख्या न दाखवण्यावर विचार सुरु आहे.

इन्स्टाग्राम त्यांच्या युझर्ससाठी एक नवं फीचर डिझाईन करत आहे. इन्स्टाग्रामवर केल्या जाणाऱ्या पोस्टवरील लाइक्स हाइड करण्याबाबत त्यांनी एक प्रयोग केला आहे. यामध्ये तुमच्या वॉलवरील कमेंट आणि लाइक्स हाइड करता येणार आहेत. लवकरच त्या फीचरचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. या फीचरचा प्रयोग कॅनडामध्ये पहिल्यादा करण्यात आला त्यानंतर पुन्हा 6 देशांमध्ये वाढवण्यात आला. लाइक काऊंट हटवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रसिद्धीची भावना युझर्सच्या मनात प्रबळ होऊ न देणं हा एकमेव उद्देश आहे. त्यातून चुकीच्या पद्धतीनं मेसेज जाऊ नये. ज्याला जास्त लाइक काऊंट तो प्रसिद्ध आणि ज्याला नाही त्याला वाईट वाटू नये. इथे प्रत्येकाच्या कलेचं स्वागत आहे. त्याला मिळणाऱ्या व्यासपीठावर लोकांनी लाइक करुन दाद द्यावी पण लाइक काऊंटवरुन समोरच्यानं प्रसिद्धी ठरवू नये हा शुद्ध हेतू फेसबुक आणि इन्स्टाचा असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. फक्त पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीलाच किती लाइक काऊंट आहेत हे दिसू शकतं. सध्या हे फीचर इंटरनल टेस्टिंग प्रोटोटाइपमध्ये आहे. सगळ्या युझर्ससाठी अद्याप उपलब्ध करण्यात आलं नाही. प्रोटोटाइपमध्ये पोस्ट केल्यानंतर 'view likes'चा ऑपशन येतो. हा ऑपशन पोस्ट शेअर करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल अशी माहिती इन्टा आणि फेसबुकने दिली आहे.

पुरात वाहून गेलेल्या बारामतीच्या विहिरीचं हे आहे सत्य, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...