नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : WhatsApp युझर्स एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिध्द इस्टंट मेसेजिंग अॅप (instant messaging app) काही स्मार्टफोनमध्ये चालणार नाही आहे. यात तुमचा फोन तर नाही ना हे, तपासून घ्या. WhatsAppच्या वतीनं हे अॅप आता iOS 8 साठी व्हॉट्सअॅप सपोर्टला (whatsapp support) बंद करण्यात येणार आहे. WABetaInfo यांनी ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली.
अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टम iOS 8 (apple operating system ios 8)वर आता यापुढे व्हॉट्सअॅप चालणार नाही आहे. मात्र एक चांगली बातमी म्हणजे iOS 8 वापरण्यासाठी युझर्सना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. ती अशी आहे की, फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्यानंतर लगेच अनइन्स्टॉल (uninstall) करू नका. त्यानंतर तुम्ही पुन्हा व्हॉट्सअॅप reinstall करू शकणार नाही.
व्हॉट्सअॅपची iOS 8 ही त्याच्या जुन्या सिस्टमवर चालत आहे. त्यामुळं iPhoneवर कॅपेटिब्लिटी 1 फेब्रुवारी 2020मध्ये संपणार आहे. WhatsAppने दिलेल्या माहितीनुसार, 2.3.7 व्हर्जनच्या अॅड्रॉईड स्मार्टफोन्स युझर्स आणि iOS 7 वर चालणाऱ्या iPhone यूझर्सला फेब्रवारी 2020 पासून WhatsApp सपोर्ट करणे बंद करणार आहे.
WhatsAppच्या मते या निर्णयाचा प्रभाव जास्त युझर्सवर पडणार नाही. जे लोक खूपच जुने अॅड्रॉईड स्मार्टफोन्स आणि आयफोन्स वापर करत आहेत त्यांच्यावरच याचा प्रभाव पडणार आहे. कारण सध्या अनेक लोक नवीन स्मार्टफोन्स वापरत आहेत आणि यामध्ये कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेट्स वेळोवेळी दिले जातात. त्यामुळे त्यांना याचा तोटा होणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, 4.0.3 किंवा त्यापेक्षा जास्त व्हर्जनचे स्मार्टफोन्स वापरा. तसेच iOS 8 पेक्षा वरचे व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सला व्हॉट्सअॅपच्या निर्णयाचा तोटा होणार नाही.
नवीन अकाउंट तयार करता येणार नाही
यामुळं युझर्सना या ऑपरेटिंद सिस्टमवर नवीन अकाउंट तयार करता येणार नाही. फेब्रवारी 2020नंतर वेरिफिकेशन होणार नाही. त्याशिवाय Windows फोनमध्ये WhatsApp 31 डिसेंबर 2019नंतर काम करणार नाही.
अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा