मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google ची मोठी कारवाई; Play Store वरुन हटवले शेकटो बनावट पर्सनल लोन Apps

Google ची मोठी कारवाई; Play Store वरुन हटवले शेकटो बनावट पर्सनल लोन Apps

गुगलने (Google) प्ले स्टोअरवर (Play Store) धोकादायक वित्तीय सेवा देणाऱ्या, पर्सनल लोन देणाऱ्या अ‍ॅपचा आढावा घेतला. त्यात अनेक अ‍ॅप्स नियमांचं, धोरणांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आल्याचं, गुगलने सांगितलं आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 14 जानेवारी : ऑनलाईन अ‍ॅप फ्रॉड प्रकरणात सतत वाढ होत आहे. कोरोना काळात डिजिटल व्यवहारात वाढ होत असताना, दुसरीकडे ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही त्याच वेगात वाढतं आहे. नुकतंच गुगलने (Google) प्ले स्टोअरवर (Play Store) धोकादायक वित्तीय सेवा देणाऱ्या, पर्सनल लोन देणाऱ्या अ‍ॅपचा आढावा घेतला. त्यात अनेक अ‍ॅप्स नियमांचं, धोरणांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आल्याचं, गुगलने सांगितलं आहे. अ‍ॅपच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत असणाऱ्या सर्व अ‍ॅप्सना Google Play Store वरुन काढून टाकण्यात आलं आहे. तसंच इतर अ‍ॅप्सच्या डेव्हलपर्सना, ते भारतात लागू असलेल्या कायद्यांचं आणि नियमांचं पालन करतात, हे दाखवण्याचं सांगितलं, असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसंच, हे दर्शवण्यात अयशस्वी ठरलेल्या अ‍ॅप्सना पुढील कोणतीही सूचना न देता काढून टाकण्यात येईल असा इशाराही गुगलने दिला आहे.

(वाचा - फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे Flipkart ची खास ऑफर)

'आम्ही भारतातल्या शेकडो पर्सनल लोन अ‍ॅप्सचा वापरकर्त्यांनी आणि सरकारी एजन्सींनी सादर केलेल्या ध्वजाच्या आधारे आढावा घेतला आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षा धोरणांचं उल्लंघन केल्याचं आढळलेले सर्व अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून काढले आहेत आणि उर्वरित अ‍ॅप्सच्या विकसकांना ते लागू असलेल्या स्थानिक कायद्याचं आणि नियमांचं पालन करतात हे दर्शवण्यास सांगितलं आहे', असं प्रोडक्ट, अँड्रॉईड सिक्योरिटी आणि प्रायव्हसीच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी सांगितलं. तसंच हे करण्यात अयशस्वी झालेल्या अ‍ॅप्सना पुढील कोणतीही सूचना न देता काढून टाकलं जाईल. त्याशिवाय, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अशा अ‍ॅप्सच्या प्रकरणांची चौकशी करण्यात मदत करू, असंही फ्रे म्हणाल्या.

(वाचा - 2020 मध्ये किती काळ स्मार्टफोनचा वापर केला; या रिपोर्टमधून मोठा खुलासा)

गेल्या काही महिन्यात भारतातील पर्सनल लोन अ‍ॅप्समध्ये वाढ झाली असून खोट्या अ‍ॅप्समुळे कोट्यवधी वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्ते योग्य निवड करत आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी आम्ही कर्ज देण्याच्या तारखेपासून 60 दिवस किंवा त्याहून अधिक आवश्यक असलेल्या, संपूर्ण कर्जाची परडफेड असणाऱ्या वैयक्तिक अ‍ॅप्सना परवानगी देतो.

(वाचा - WhatsApp च्या नव्या पॉलिसीमुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका? वाचा हे FACTS)

वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी, डेव्हलपर्सना केवळ सध्याची वैशिष्ट्ये किंवा सेवा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीची विनंती करणं आवश्यक आहे. अघोषित किंवा नाकारलेली वैशिष्ट्ये किंवा हेतूंसाठी वापरकर्त्याच्या डिव्हाईसमध्ये प्रवेश देणाऱ्या परवानग्यांचा वापर करू नये असं गुगलने म्हटलं आहे.
First published:

Tags: Google

पुढील बातम्या