मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

2020 मध्ये किती काळ स्मार्टफोनचा वापर केला; या रिपोर्टमधून मोठा खुलासा

2020 मध्ये किती काळ स्मार्टफोनचा वापर केला; या रिपोर्टमधून मोठा खुलासा

नवीन फोन खरेदी केल्यानंतर लगेचच त्याला स्क्रिनगार्ड लावणं गरजेचं आहे. अनेकदा नवे फोन स्पिपरी असतात. त्यामुळे फोन हातातून पडला तर स्क्रिन डॅमेज होऊ शकते. त्यामुळे फोनच्या सुरक्षिततेसाठी स्क्रिनगार्ड लगेच लावणं महत्त्वाचं आहे.

नवीन फोन खरेदी केल्यानंतर लगेचच त्याला स्क्रिनगार्ड लावणं गरजेचं आहे. अनेकदा नवे फोन स्पिपरी असतात. त्यामुळे फोन हातातून पडला तर स्क्रिन डॅमेज होऊ शकते. त्यामुळे फोनच्या सुरक्षिततेसाठी स्क्रिनगार्ड लगेच लावणं महत्त्वाचं आहे.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी 2020 मध्ये अधिकतर लोक आपल्या घरातच होते. यावेळी अनेकांनी सर्वाधिक वेळ मोबाईलवर घालवला. या काळात अ‍ॅप डाउनलोड करण्याचं प्रमाण जवळपास 30 टक्क्यांनी वाढलं. अ‍ॅप स्टोर कंज्युमर स्पेंडमध्ये भारताचं रँकिंग 25 आहे, मात्र यात 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. बुधवारी AppAnnie या वार्षिक 'State of Mobile' रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. भारत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ - अ‍ॅप डाउनलोड प्रकरणात भारत जगभरात चीननंतर, दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. AppAnnie चे सीनियर इनसाइट्स मॅनेर लेक्सी सिदोवने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, गेल्या वर्षात सर्वाधिक गेम्स डाउनलोड केले गेले. प्रत्येक 5 डाउनलोडपैकी 2 गेम होते. 2020 मध्ये भारतात माहिन्याला ऍक्टिव्ह युजर्स रँकिंगनुसार, सर्वाधिक फेसबुक ऍपची धूम होती. वापराच्या हिशोबाने व्हॉट्सऍप आणि फेसबुक टॉपवर होते. गेल्या वर्षी प्रत्येक युजरने प्रत्येक महिन्याला सरासरी 21.3 तास व्हॉट्सऍपवर घालवले, जे 2019 च्या तुलनेत 25 टक्के अधिक आहेत. तसंच युजर्सनी फेसबुकवर 15 टक्के आणि इन्स्टाग्रामवर 10 टक्के अधिक वेळ घालवला. भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जूनमध्ये चीनचं शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप टिकटॉक भारतात बॅन करण्यात आलं. त्यामुळे ते पाचव्या क्रमांकावर गेलं. तर 2019 मध्ये टिकटॉकने 240 टक्क्यांची ग्रोथ रेकॉर्ड केली होती. गेम ऍपमध्ये 2020 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक वेळ लूडो किंग आणि पबजी मोबाईलवर घालवला. 2020 मध्ये लोकांनी फायनानेंशियल ऍप्सकडेही लक्ष दिलं. टॉप 5 इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेंडिंग ऍप्सवर लोकांनी गेल्या वर्षात 75 टक्के अधिक वेळ घालवला. व्हिडीओ स्ट्रिमिंगमध्ये यूट्यूब आणि एमएक्स प्लेयर टॉपवर होते. यात 2019 च्या तुलनेत क्रमश: 25 टक्के आणि 20 टक्क्यांची वाढ झाली. लॉकडाउनमध्ये लोक घरातच होते, त्यावेळी यूट्यूबवर सर्वाधिक खाण्याचे पदार्थ पाहण्यात आले. त्यामुळे फूड आणि ड्रिंक अ‍ॅप कॅटेगरीमध्ये 35 टक्क्यांची घसरण झाली आहे. यावेळी एज्युकेशन ऍप्स डाउनलोडमध्ये 170 टक्के, बिजनेस ऍप्समध्ये 120 टक्के, हेल्थ अँड फिटनेस ऍप्समध्ये 80 टक्क्यांची ग्रोथ नोंदवण्यात आली आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या