नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : गुगल प्ले (Google) अशा अॅप्सवर प्रतिबंध करत आहे, जे शुगर डेटिंग किंवा कंपनसेटेड सेक्शुअल रिलेशनशिपला (Compensated Sexual Relationships) प्रोत्साहन देतात. 1 सप्टेंबरपासून गुगल अॅप स्टोर सेक्शुअल कंटेंटवर (Sexual Content) आपल्या नव्या प्रतिबंधांच्या रुपात शुगर-डॅडी अॅप्सला सुविधा देण्यास बंदी घालणार आहे.
माउंटेन व्यू टेक कंपनीने गुगल प्ले कंसोल वेबसाईटवर एका पोस्टच्या माध्यमातून नव्या धोरणांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांची घोषणा केली आहे. या बदलांनुसार कंपनसेटेड सेक्शुअल रिलेशनशिप किंवा शुअल डेटिंगवाल्या (Sugar Dating) अॅप्सवर बंदी आणली जाईल.
शुगर डेटिंग अॅपमध्ये एक श्रीमंत वृद्ध एखाद्या तरुणीला सेक्शुअल रिलेशनशिपच्या बदल्यात भरपाई देतो. काही पत्रकारांनी अशा प्रकारच्या काही अॅप्सची ओळख केली आहे, जे स्पष्टपणे शुगर डेटिंगची सुविधा देतात. हजारोंनी हे अॅप्स इन्स्टॉल झाले आहेत. गुगलचा हा निर्णय अमेरिकी कायद्यानुसार प्रेरित असून आता अशा अॅप्सवर पूर्ण प्रतिबंध लावण्यात येणार आहे. आक्षेपार्ह कंटेंटवर प्रतिबंध आणण्यासाठी टेक क्षेत्रातील दिग्गज आपल्या धोरणांमध्ये बदल करत आहेत.
सरकार, संघटना आणि युजर्सच्या सुरक्षेच्या संबंधित आलेल्या प्रतिक्रियांनंतर भरपाई देण्याच्या बदल्यात सेक्शुअल रिलेशनशिप सुविधा देणारे अॅप्स प्रतिबंधित करण्यासाठी आपल्या धोरण्यात बदल केले असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.
याव्यतिरिक्त Google एका वर्षापेक्षा अधिक काळ वापरात नसलेली निष्क्रिय खाती बंद करणार आहे. कंपनी अशाही अॅप्सवरर बंदी आणणार आहे, ज्यात मुलांना लक्ष्य केलं जातं. हे बदल 1 सप्टेंबरपासून लागू केले जाणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.