मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /15 लाखहून अधिक Apps हटवले जाणार? Apple आणि Google चा इशारा, पाहा काय आहे कारण

15 लाखहून अधिक Apps हटवले जाणार? Apple आणि Google चा इशारा, पाहा काय आहे कारण

Apple आणि Google ने यावर्षीच्या सुरुवातीला डेव्हलपर्सला इशारा दिला आहे. App Store आणि Play Store मधून जवळपास 30 टक्के Apps हटवले जाण्याचा धोका आहे.

Apple आणि Google ने यावर्षीच्या सुरुवातीला डेव्हलपर्सला इशारा दिला आहे. App Store आणि Play Store मधून जवळपास 30 टक्के Apps हटवले जाण्याचा धोका आहे.

Apple आणि Google ने यावर्षीच्या सुरुवातीला डेव्हलपर्सला इशारा दिला आहे. App Store आणि Play Store मधून जवळपास 30 टक्के Apps हटवले जाण्याचा धोका आहे.

नवी दिल्ली, 17 मे : Apple आणि Google ने यावर्षीच्या सुरुवातीला डेव्हलपर्सला इशारा दिला आहे. अशा Apps बाबत इशारा दिला आहे, जे मागील अनेक काळापासून अपडेट केले गेले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, Apple ने काही डेव्हलपर्सला नोटिस पाठवली होती आणि त्यांना दिलेल्या कालावधीत App अपडेट न केल्यास अ‍ॅप्स App Store मधून हटवले जातील, असा इशारा दिला आहे. एनालिटिक्स फर्म पिक्सालेटच्या एक रिपोर्टनुसार, App Store आणि Play Store मधून जवळपास 30 टक्के Apps हटवले जाण्याचा धोका आहे.

रिपोर्टनुसार, Google Play Store आणि Apple App Store चे 1.5 मिलियन Apps ला अनेक वर्षांपासून अपडेट मिळालेलं नाही. 314,000 हून अधिक अ‍ॅप्स पाच वर्षांपासून अधिक काळ अपडेट केलेले नाहीत. यात 58 टक्के Apple App Store (184k अ‍ॅप्स) आणि 42 टक्के Google Play Store वर (130k अ‍ॅप्स) आहेत.

काही डेव्हलपर्सने Apple आणि Google च्या इशाऱ्यावर काम करण्यास सुरुवात केली. 2022 च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत Google आणि Apple अ‍ॅप स्टोरवर 1.3 मिलियन App अपडेट केले गेले आहेत.

हे वाचा - आता गाडी चालवणं अधिक सुरक्षित होणार; टायर्ससाठीही येणार स्टार रेटिंग, सरकार लागू करणार नवा नियम

Apple ने App Store वर Apps अपडेट न झाल्यास ते हटवण्याचं सांगितलं आहे. परंतु ज्या युजर्सकडे आधीच जर अपडेट नसलेलं App असेल, तर ते युजरकडे तसंच राहील. परंतु नवीन डाउनलोड करता येणार नाही. Apple ने दिलेल्या माहितीनुसार, Apps मूल्यांकनची प्रक्रिया सतत सुरू आहे. जे अ‍ॅप्स काम करत नाहीत, जे डेव्हलपर्स नियमांचं पालन करत नाहीत किंवा अतिशय जुने आहेत ते हटवले जाण्यावर काम सुरू आहे. Google नेही मागील काही दिवसांत अशाच प्रकारची कारवाई केली होती.

First published:
top videos

    Tags: Apple, Apps, Google, Tech news