मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

UPI Payment करता? UPI PIN द्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून कसा कराल बचाव, NPCI ने केलं अलर्ट

UPI Payment करता? UPI PIN द्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून कसा कराल बचाव, NPCI ने केलं अलर्ट

सायबर फ्रॉडस्टर्स फ्रॉडसाठी नव्या-नव्या ट्रिकचा वापर करतात. एटीएम किंवा क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट अपडेट, KYC अपडेट, लॉटरी जिंकल्याच्या नावाने अशा अनेक मार्गांनी अनेकांची फसवणूक झाली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 15 जानेवारी : एकीकडे डिजिटल ट्रान्झेक्शन (Digital Transaction) वाढत असताना, दुसरीकडे सायबर क्राइम, फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. सायबर फ्रॉडस्टर्स फ्रॉडसाठी नव्या-नव्या ट्रिकचा वापर करतात. एटीएम किंवा क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट अपडेट, KYC अपडेट, लॉटरी जिंकल्याच्या नावाने अशा अनेक मार्गांनी अनेकांची फसवणूक झाली आहे.

या प्रकारांमध्ये लॉटरी लागल्याच्या नावाने फसवणूक होण्याचा प्रकार अतिशय कॉमन आहे. फसवणूक करणारे फोन करुन कार जिंकल्याचं किंवा लाखोंची लॉटरी जिंकल्याचं सांगतात. अनेक जण यात अडकतात आणि आपल्या मेहनतीची कमाई एका मिनिटांत गमावून बसतात.

हे वाचा - वेळीच सावध व्हा! या 5 App ने उडवली झोप; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक बाब

Online Fraud -

लोकांना लॉटरी लागल्याचं सांगून त्यांना एक लिंक पाठवली जाते. पैसे मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करुन UPI PIN टाकण्यास सांगतात. ज्यावेळी एखादा व्यक्ती UPI PIN टाकतो, त्यावेळी बँक खात्याचे डिटेल्स सायबर फ्रॉड करणाऱ्यांकडे पोहोचतात आणि संपूर्ण रक्कम आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करुन घेतात.

याबाबत NPCI कडून देखील वेळोवेळी अलर्ट केलं जातं. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, पैसे मिळवण्यासाठी UPI PIN टाकण्याची गरज नसते. UPI PIN चा वापर आपल्या अकाउंटमधून दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. UPI PIN चा वापर केल्याने पैसे अकाउंटमधून कट होतात, अकाउंटमध्ये येत नाहीत. त्यामुळे कोणीही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी UPI PIN मागत असेल, तर सावध व्हा.

UPI चा वापर करण्यासाठी बँक अकाउंटशी तुमचा मोबाइल नंबर लिंक असणं गरजेचं असतं. UPI PIN तयार करण्यासाठी कोणतंही UPI App जसं Google Pay, BHIM, Paytm, PhonePe डाउनलोड केल्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करा. इथे वेरिफिकेशन केलं जाईल. वेरिफिकेशननंतर वर्चुअल पेमेंट अॅड्रेस तयार होईल. याच्या मदतीने UPI Transaction करता येईल.

हे वाचा - कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

फ्रॉडपासून कसा कराल बचाव?

- तुमचा UPI PIN कोणाशीही शेअर करू नका.

- नेहमी विश्वासार्ह App वरुनच UPI Payment करा.

- BHIM App सर्वात विश्वासार्ह डिजिटल पेमेंट App आहे.

- कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

- तसंच लिंक चुकून ओपन केल्यास, UPI PIN चा वापर करू नका.

- लिंकद्वारे फिशिंग स्कॅम केले जातात.

- UPI PIN वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Online payments, Upi