मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Meet चं जबरदस्त फीचर, Live Translated Captions मुळे भाषा ठरणार नाही अडचण

Google Meet चं जबरदस्त फीचर, Live Translated Captions मुळे भाषा ठरणार नाही अडचण

गुगलनं (Google) आता आपल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये (video conferencing software) लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं फीचर (Live translated caption feature) लाँच केलं आहे. काही महिन्याच्या टेस्टिंगनंतर हे फीचर पब्लिक केलं गेलं आहे.

गुगलनं (Google) आता आपल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये (video conferencing software) लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं फीचर (Live translated caption feature) लाँच केलं आहे. काही महिन्याच्या टेस्टिंगनंतर हे फीचर पब्लिक केलं गेलं आहे.

गुगलनं (Google) आता आपल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये (video conferencing software) लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं फीचर (Live translated caption feature) लाँच केलं आहे. काही महिन्याच्या टेस्टिंगनंतर हे फीचर पब्लिक केलं गेलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 15 जानेवारी : वर्क्र फ्रॉम होमच्या काळात ऑनलाईन मीटिंग्जसाठी तुमच्यापैकी अनेकांनी 'गुगल मीट' (Google Meet) या सॉफ्टवेअरचा वापर केला असेल. गुगलनं (Google) आता आपल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये (video conferencing software) लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं फीचर (Live translated caption feature) लाँच केलं आहे. काही महिन्याच्या टेस्टिंगनंतर हे फीचर पब्लिक केलं गेलं आहे. गुगल मीटचं हे फीचर मोबाईल आणि वेब क्लायंट या दोन्ही ठिकाणी काम करू शकतं. ट्रान्सलेशन फीचरमुळे लँग्वेज प्रोफिशियन्सीतील (language proficiency) अडथळे दूर होऊन व्हिडीओ कॉलला अधिक इन्क्ल्युझिव्ह (inclusive) आणि कोलॅबरेटिव्ह (collaborative) होण्यास मदत होणार आहे.

गुगलनं आपल्या वर्कस्पेस ब्लॉगवरील (Workspace blog) पोस्टमध्ये या फीचरची माहिती दिली आहे. सध्या ते मर्यादित स्वरुपात असल्याचं सांगितलं जात आहे. Google Meet चं हे ट्रान्सलेशन फीचर सध्या फक्त फ्रेंच (French), जर्मन (German), पोर्तुगीज (Portuguese) आणि स्पॅनिश (Spanish) या चारच भाषा ट्रान्सलेट करण्यास समर्थ आहे.

गेल्या वर्षी (2022) गुगलच्या i/o डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये (developer conference) या फीचरची घोषणा करण्यात आली होती. गुगलच्या मते, जेव्हा युजर त्यांच्या मातृभाषेतील कंटेंट वापरतात तेव्हा त्याचा त्यांना जास्त फायदा होतो. मातृभाषेमुळे किंवा येत असलेल्या भाषेचा वापर झाल्यास, माहितीची देवाण-घेवाण (information sharing), लर्निंग आणि कोलॅबरेशन (collaboration) या गोष्टी समान पातळीवर होतात. शिवाय मीटिंग प्रत्येकासाठी चांगली ठरते. या गोष्टीचा विचार करून Google Meet मध्ये ट्रान्सलेटेड कॅप्शनचं फीचर डिझाइन केलं गेलं आहे. व्यावसायिक गोष्टींव्यक्तिरिक्त शैक्षणिक हेतुंसाठीदेखील (educational purposes) हे फीचर उपयुक्त ठरू शकतं.

हे वाचा - Bluetooth चा दातांशी काय आहे संबंध? जाणून घ्या नावामागची कहाणी

Google Meet मधील हे फीचर वापरण्यासाठी, युजरला सेटिंग्जमध्ये जाऊन कॅप्शन स्वीच-ऑनचा ऑप्शन ऑन करावा लागेल. ट्रान्सलेशन टॉगल अॅक्टिव्ह करण्यापूर्वी ते इंग्रजीमध्ये सेट करणं आवश्यक आहे. Google Meet मध्ये ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचर अॅक्टिव्हेट कसं करायचं -

- तुमच्या कॉम्प्युटरवर Google Meet ओपन करा.

- तिथे More Options वर क्लिक करा.

- इथे अगोदर सेटिंग्ज दिसतील. त्यामध्ये कॅप्शन्स हा ऑप्शन दिसेल.

- त्यातील ट्रान्सलेटेड कॅप्शन हा पर्याय ऑन करा.

- शेवटी भाषा निवडा (फ्रेंच, जर्मन, पोर्तुगिज आणि स्पॅनिश).

हे वाचा - Titan चं Smart Glass लाँच; सेल्फी, गाणी ऐकण्यासह मिळणार जबरदस्त सुविधा

Google Meet हे सर्वात लोकप्रिय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरपैकी एक आहे. झूम (Zoom) आणि मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या (Microsoft Teams) सॉफ्टवेअर्ससोबत त्याची जोरदार स्पर्धा आहे. 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या रोगामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर Google Meet ला आणखी जास्त महत्त्व प्राप्त झालं. कोरोना लॉकडाऊनपासून अनेक बिझनेस आणि शाळांनी आपल्या व्हर्च्युअल मीटिंग व क्लासेस घेण्यासाठी Google Meet चा 'स्टॅण्डर्ड टूल' म्हणून स्वीकार केला आहे. 2020 पासून, गुगलनं गुगल मीटमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. गुगलनं या अॅपमध्ये काही उपयुक्त फीचर्सचा समावेश केला. या फीचर्समुळं व्हर्च्युअल संवाद आणखी रियल होण्यास मदत होत आहे.

First published:

Tags: Google, Tech news, Video call