मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Bluetooth चा दातांशी काय आहे संबंध? जाणून घ्या नावामागची कहाणी

Bluetooth चा दातांशी काय आहे संबंध? जाणून घ्या नावामागची कहाणी

काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त वायर्ड इअरफोन्स (wired earphones) बाजारात उपलब्ध होते. आता त्यांची जागा ब्लू-टूथ इअरफोनने (Bluetooth earphones) घेतली आहे. ब्लू-टूथ इअरफोन सहजपणे कानात राहतात आणि सहसा ते पडत नाही. त्यामुळे याचा वापरही वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का, की ब्लू-टूथ हे नाव कसं पडलं असेल?

पुढे वाचा ...

मुंबई, 14 जानेवारी : काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त वायर्ड इअरफोन्स (wired earphones) बाजारात उपलब्ध होते. आता त्यांची जागा ब्लू-टूथ इअरफोनने (Bluetooth earphones) घेतली आहे. ब्लू-टूथ इअरफोन सहजपणे कानात राहतात आणि सहसा ते पडत नाही. त्यामुळे याचा वापरही वाढला आहे. हे इअरफोन वापरताना केवळ तुमच्या फोनमधलं ब्लू-टूथ (Bluetooth) ऑन करावं लागतं. फोनमधल्या ब्लू-टूथचा वापर करून तुम्ही कोणत्याही वायरशिवाय मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप आदींमधून फाइल्सची देवाणघेवाण करू शकता; पण कधी विचार केला आहे का, की ब्लू-टूथ हे नाव कसं पडलं असेल? त्याचा दातांशी काही संबंध आहे का? ब्लू-टूथ हे नाव कसं पडलं, हे जाणून घेऊ या.

तुमच्या फोनमध्ये ब्लू-टूथ असेल. त्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही वायरशिवाय फाइल्सची देवाणघेवाण करू शकता. ब्लू-टूथ हे खूप युझर-फ्रेंडली मानलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा याचा वापर डेटा ट्रान्स्फरसाठी केला जातो; पण 'ब्लू-टूथ' हे नाव कसं पडलं असेल, याचा विचार केला आहे का? याचं भाषांतर केलं, तर ते 'निळा दात' असं होतं.

तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल, की ब्लू-टूथ हे नाव तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कामामुळे नाही, तर एका राजाच्या नावावरून देण्यात आलंय. या नावामागे निळा दातसुद्धा आहे, असा दावाही काही रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. अनेक रिपोर्टमध्ये आणि ब्लू-टूथच्या वेबसाइटवरही असं म्हटलंय की, ब्लू-टूथचं नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजाच्या (Scandinavian king) नावावर आहे. त्या राजाचं नाव हॅराल्ड गोर्मसन (Harald Gormsson) असं होतं. डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन या देशांच्या राजांना स्कॅन्डिनेव्हियन राजे म्हटलं जातं.

काही रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, की ब्लू-टूथ हे नाव किंग हॅराल्ड गोर्मसन यांच्या नावावरून ठेवण्यात आलं, हे खरं आहे; पण ब्लू-टूथच्या मालकाने या तंत्रज्ञानाचं नाव त्या राजाच्या नावावरून का ठेवलं, हा प्रश्न आहे. ब्लू-टूथचा मालक जाप हार्टसेन (Jaap HeartSen) हा एरिक्सन (Ericsson) कंपनीत रेडिओ सिस्टीमचं (Radio System) काम करत असे. हे काम एरिक्सनबरोबरच नोकिया, इंटेलसारख्या कंपन्याही करत होत्या. अशा अनेक कंपन्यांनी मिळून एक गट तयार केला होता. त्याला एसआयजी (Special Interest Group) असं नाव देण्यात आलं होतं.

हॅराल्ड गोर्मसन या राजाचं नाव blátǫnn होतं. ते डॅनिश भाषेतलं नाव आहे. याचा इंग्रजीत अर्थ ब्लू-टूथ असा होतो, असंही काही रिपोर्टमध्ये म्हटलंय. राजाचे नाव blátnn म्हणजेच ब्लू-टूथ का ठेवलं गेलं, यामागेही एक कथा सांगितली जाते. इकॉनॉमिक टाइम्ससह अनेक वेबसाइट्सनी म्हटलं आहे, की राजाला ब्लू-टूथ हे नाव देण्यात आले. कारण त्याचा एक दात, जो निळ्या रंगाचा दिसत होता, तो एक प्रकारे 'डेड दात' होता. या राजाच्या निळ्या रंगाच्या दातावरूनच म्हणजेच ब्लू-टूथवरून 'ब्लू-टूथ' हे नाव पडलं आहे.

ब्लू-टूथचा वापर करताना तुम्हाला बऱ्याचदा वाटत असेल, की हे नाव तंत्रज्ञानाशी संबंधित आहे; मात्र ही गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल ना!

First published:

Tags: Tech news