मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Road Safety : गाडीने स्पीड लिमिट पार केल्यास Google Maps देणार इशारा; फक्त ऑन करा ही सेटिंग्ज

Road Safety : गाडीने स्पीड लिमिट पार केल्यास Google Maps देणार इशारा; फक्त ऑन करा ही सेटिंग्ज

प्रवास करताना स्पीड लिमिटच्या पुढे गेला तर गूगल मॅप्सद्वारे (Google Maps Speed ​​Limit function) वरून ड्रायव्हरला इशारा देण्यात येतो. कसं activate करायचं हे फीचर?

प्रवास करताना स्पीड लिमिटच्या पुढे गेला तर गूगल मॅप्सद्वारे (Google Maps Speed ​​Limit function) वरून ड्रायव्हरला इशारा देण्यात येतो. कसं activate करायचं हे फीचर?

प्रवास करताना स्पीड लिमिटच्या पुढे गेला तर गूगल मॅप्सद्वारे (Google Maps Speed ​​Limit function) वरून ड्रायव्हरला इशारा देण्यात येतो. कसं activate करायचं हे फीचर?

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : प्रवास करताना वेगमर्यादा ओलांडली तर कारवाई होऊ शकते. हल्ली सीसीटीव्हीमुळे हायवेवर स्पीड लिमिट क्रॉस करून चालतच नाही. पण गाडी चालवताना चुकून स्पीड लिमिटच्या पुढे गेला तर आता गूगल मॅप्सद्वारे (Google Maps Speed ​​Limit function) कळणार आहे. Google Maps ड्रायव्हरला अपघाताबद्दल सावधानतेचा इशारा देईल. गूगल मॅप्सद्वारे वाहनाचा स्पीड काय आहे हे ही कळतं.

बहुतेक वेळा अपघात हायस्पीडमुळेच होतात. अशा वेळी वेग वाढल्याची सूचना (google maps speed limit showing) मिळाली तर अपघात टळू शकतील. गूगल मॅप्सने 2019 साली ऑन-स्क्रीन स्पीडोमीटरची सुविधा युजर्ससाठी उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी युरोप, आशिया, दक्षिण अमेरिका आणि यूके अशा देशांमध्येच ही सेवा उपलब्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे गूगलद्वारे फक्त त्याच भागाच्या प्रवासादरम्यानची स्पीड लिमिट वाहनचालकाला दिसत होती ज्याठिकाणी तो राहत आहे.

Google Chrome युजर्स सावधान, लगेच करा सिस्टम Update; नाहीतर बसेल मोठा फटका

स्पीड लिमिट सुविधा बंद करण्याचा ऑप्शनही त्यात देण्यात आला होता. स्पीड लिमिट  सेटिंग ही Google Maps च्या उजव्या बाजूला आहे. त्याला चालू करण्यासाठीचे आणि प्रवास करण्यासाठीच्या रूट्सचाही पर्याय त्यात दिलेला असतो. त्यानंतर ही सेटिंग सुरू केली की युजर्सला जेव्हा त्याची गाडी ही स्पीड लिमिट क्रॉस करते त्यावेळी त्याला गूगलद्वारे धोक्याची सूचना देण्यात येते.  या सेवेचा लाभ हा अँड्रॉईड स्मार्टफोनमध्येही घेता येतो.

Hackers च्या निशाण्यावर तुमचा Smartphone? डेटाचोरीला असा घाला आळा

गूगल स्पीड लिमिट कसं Active कराल?

- सर्वप्रथम गूगल मॅप्स ओपन करा

- उजव्या बाजूला असलेल्या प्रोफ़ाइल पिक्चर किंवा इनिशियल्सवर क्लिक करा

- त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा

- नेविगेशन सेटिंगला स्क्रोल करा

- आता या सुविधेला बंद करण्यासाठी स्पीड लिमिट सेटिंगवर जाऊन बंद करता येऊ शकते

First published:

Tags: Car, Google, Road accidents in india