नवी दिल्ली, 30 जून: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने अनेक मार्गांनी लोकांचं जीवन सुलभ केलं आहे. आता कंपनी असं टूल आणत आहे, ज्यामुळे लोकांपर्यंत जेवण पोहोचवलं जाऊ शकेल. यासाठीच गुगलने फूड सपोर्ट टूल लाँच केलं आहे. गुगलचं हे पाऊल फूड फॉर गुड टीमचा भाग आहे.
गुगलने याला Find Food Support असं नाव दिलं आहे. यात फूड लोकेटर टूल देण्यात आलं आहे. फूड लोकेटर टूलला Google Maps द्वारे वापरता येईल. याच्या मदतीने युजर्स आपल्या जवळची फूड बँक, फूड पँट्री किंवा स्कूल लंच प्रोग्राम सर्च करू शकतात. आपल्या कम्युनिटीमधून ते साइट पिकअप करू शकतात. यासाठी गुगल अनेक नॉन-प्रॉफिट ग्रुप्ससह काम करत आहे.
या कामासाठी गुगलने नॉन-प्रॉफिट No Kid Hungry आणि FoodFinder अशा संस्थांशी करार केला आहे. त्याशिवाय गुगल यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरसह काम करत आहे. यामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत 90000 ठिकाणी फ्री फूड सपोर्ट देऊ शकेल. Google ने येणाऱ्या काळात यात आणि लोकेशन जोडण्याचीही बाब सांगितली आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे अनेक लोकांनी अन्नाच्या कमतरतेचा सामना केला आहे. अमेरिकेत अन्नाच्या कमतरतेमुळे 7 पैकी एक अमेरिकी प्रभावित झाला होता. यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांचाही समावेश होता. अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये आणि सध्याच्या काळात सर्वांपर्यंत जेवण पोहोचावं यासाठी गुगलने हे पाऊल उचललं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Initiative, Tech news, Technology