मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Drive आता अधिक सुरक्षित होणार, नव्या Security Update मुळे युजरला असा होणार फायदा

Google Drive आता अधिक सुरक्षित होणार, नव्या Security Update मुळे युजरला असा होणार फायदा

गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून फाइल शेअरिंग (File Sharing) अधिक सुरक्षित व्हावं, यासाठी हा सिक्युरिटी अपडेट लागू करण्यात येणार असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून फाइल शेअरिंग (File Sharing) अधिक सुरक्षित व्हावं, यासाठी हा सिक्युरिटी अपडेट लागू करण्यात येणार असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून फाइल शेअरिंग (File Sharing) अधिक सुरक्षित व्हावं, यासाठी हा सिक्युरिटी अपडेट लागू करण्यात येणार असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 29 जुलै : क्लाउड स्टोरेजसाठी (Cloud Storage) मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या गुगल ड्राइव्हमध्ये (Google Drive) एक महत्त्वाचा सिक्युरिटी अपडेट (Security Update) येणार आहे. 13 सप्टेंबर 2021 रोजीपासून हा सिक्युरिटी अपडेट लागू होणार आहे. गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून फाइल शेअरिंग (File Sharing) अधिक सुरक्षित व्हावं, यासाठी हा सिक्युरिटी अपडेट लागू करण्यात येणार असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. याबद्दलची अधिक माहिती गुगलकडून येत्या काही दिवसांत युजर्सना दिली जाणार आहे.

    या सिक्युरिटी अपडेटमुळे ड्राइव्हमधल्या काही फाइल्सच्या लिंक्समध्ये (Links) बदल होणार असल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संबंधित फाइल्सकरता नव्याने अ‍ॅक्सेस रिक्वेस्ट (Access Request) स्वीकाराव्या/द्याव्या लागतील, असंही गुगलने सांगितलं आहे.

    सध्या अनेक युजर्सना गुगल ड्राइव्हला लॉगिन केल्यानंतर सिक्युरिटी अपडेटबद्दलचा बॅनर दिसत असून, ज्यावर या बदलाचा परिणाम होणार आहे, अशा फाइल्सची यादीही दिसत आहे. हा सिक्युरिटी अपडेट लागू करायचा की नाही, याचा निर्णय युजर्स घेऊ शकतात. सिक्युरिटी अपडेट स्वीकारल्यानंतर फाइल्सच्या लिंक्स अपडेट होतील आणि रिसोर्स कीचाही (Resource Key) त्यात समावेश असेल. अपडेट न स्वीकारण्याचा पर्याय दिलेला असला, तरी त्याची शिफारस केली जात नाही.

    Gmail इनबॉक्समधले नको असलेले असंख्य ईमेल्स करा एका फटक्यात डिलिट

    या बदलाचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी गुगल ड्राइव्ह वेब ब्राउजरमध्ये ओपन करावं. त्यानंतर संबंधित विंडोच्या सर्वांत वरच्या भागात असलेला बॅनर पाहा. त्यातल्या 'See files'वर क्लिक करा. त्यानंतर या अपडेटमुळे ज्यांच्या लिंक्स बदलणार आहेत, त्या फाइल्सची यादी दिसेल. त्या फाइल्स ज्यांच्याशी शेअर केलेल्या आहेत, त्यांनी आधीच त्या पाहिलेल्या असतील, तर त्यांना त्या फाइल्सचा अ‍ॅक्सेस कायम राहील. अन्य युजर्सना त्या अ‍ॅक्सेससाठी कदाचित पुन्हा रिक्वेस्ट पाठवावी लागेल.

    WhatsAppचं नवं अपडेट; नवा मेसेज आल्यावरही दिसणार नाही हे Chat,पाहा कसा कराल वापर

    गुगलने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर 2021 रोजी युजर्सच्या काही फाइल्सना सिक्युरिटी अपडेट लागू केला जाईल. पब्लिकली पोस्ट केलेल्या फाइल्सचा सिक्युरिटी अपडेट काढून टाकता येऊ शकतो. ड्राइव्ह ऑन द वेब आणि अ‍ॅपल आणि अँड्रॉइड अ‍ॅप्स या सर्व प्लॅटफॉर्म्सवर हे नियम लागू असतील.

    सिक्युरिटी अपडेट लागू करण्यासाठी युजर्सना काहीच करावं लागणार नाही. सिक्युरिटी अपडेट बॅनरमध्ये 'Applied' स्टेटस असलेल्या फाइल्स तुम्हाला दिसू शकतात. तुम्हाला सिक्युरिटी अपडेट नको असेल, तर प्रत्येक फाइलवर क्लिक करून 'Remove Security Update' यावर क्लिक करू शकता.

    First published:
    top videos

      Tags: Google, Tech news