नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : कोरोना महासाथ, लॉकडाउनमुळे अनेकांना आपले नातेवाईक, मित्र परिवाराची प्रत्यक्ष भेट घेणं शक्य नव्हतं. अशात Video Call हा एकमेव एकमेकांच्या भेटीसाठीचा पर्याय ठरला. ऑफिसच्या मिटिंगदेखील Online Video Call वर होत होत्या. यादरम्यान Google Meets, Zoom सारखे अनेक प्लॅटफॉर्म डेव्हलप झाले. इंटरनेटच्या जगात अनेक उपलब्ध होत असताना, अनेक युजर्सला टेक्निकल आव्हानांचाही सामना करावा लागतो. या आव्हानांचा सामना करणाऱ्यांमध्ये केवळ सर्वसामान्यच नाही, तर खुद्द Google चे CEO सुंदर पिचाईही सामिल आहेत. नुकत्याच एका मुलाखतीवेळी ही मजेशीर किस्सा समोर आला आहे. अनेकवेळा मिटिंगमध्ये Video Call ला अनम्यूट करणं लक्षात राहत नाही. आता असाच काहीसा किस्सा गुगलचे CEO सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai forgot unmute video call) यांच्यासोबत घडला आहे. 1955 मध्ये बनवण्यात आलेल्या एक मपेट कॅरेक्टर Kermit सह सुंदर पिचाई इंटरव्ह्यू करत होते. KermitTheFrog सह Video Interview देत असताना त्यांना अनम्युट करणं लक्षात आलं नाही. काही सेकंदाच्या संभाषणानंतर त्यांच्या डिव्हाईसचा माइक बंद असल्याचं लक्षात आलं. सुंदर पिचाई यांना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनादेखील आपल्या या चुकीवर हसू आवरलं नाही.
Always remember to unmute...thanks @KermitTheFrog for joining us on @YouTube #DearEarth and chatting about some of our shared interests:) 🌎🏏🦗 https://t.co/RCIUnPcltK pic.twitter.com/cEd6BjkA6H
— Sundar Pichai (@sundarpichai) October 27, 2021
तुमचं Aadhaar Card परवानगीशिवाय कुठे वापरलं जातंय का? एका मिनिटात असं तपासा मपेट कॅरेक्टर Kermit सह बोलत असताना पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांना काही प्रश्न विचारण्यात आले. परंतु त्यांचा माइक म्युट असल्याने ते काय बोलत आहेत याचा आवाज येत नव्हता. त्यानंतर मुलाखतकारांनी त्यांना थांबवत तुमचा माईक म्युट आहे असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपला माइक अनम्युट केला. परंतु त्यांना त्यांच्या या चुकीवर हसू आवरलं नाही. Interview सुरू झाल्यानंतर जवळपास 11व्या सेकंदाला त्यांना हा प्रकार लक्षात आला. Airtel ग्राहकांनो हे काम अजिबात करू नका, थेट CEO ने दिला सावधानतेचा इशारा Sundar Pichai यांनी हा संपूर्ण प्रकार ट्विटरवर शेअर केला आहे. ‘माझा माईक म्युट होता. हा प्रकार यावर्षी माझ्यासोबत अनेकदा घडलेला आहे’ असंही त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांच्या विविध प्रतिक्रियाही येत आहेत.