नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : कोरोना काळात एकीकडे ऑनलाइन, डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे सायबर फ्रॉडचीही मोठी प्रकरणं समोर आली. वाढती सायबर फ्रॉड प्रकरणं पाहता Airtel ने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. Airtel चे CEO Gopal Vittal यांनी फ्रॉडबाबत ग्राहकांना सावध राहण्याचं सांगितलं आहे.
एका प्रकरणात फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने तो कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगत ग्राहकाकडून बँक डिटेल्स घेतले. KYC फॉर्म अपडेट करण्याच्या नावाखाली फ्रॉडस्टरने डिटेल्स मिळवले. त्याशिवाय Gopal Vittal यांनी ग्राहकांना सेफ्टी मेजर्सबाबत माहिती दिली आहे.
- सध्या असे अनेक UPI Apps, ई-कॉमर्स साइट अॅक्टिव्ह आहेत, ज्या खऱ्या वाटतात परंतु त्या ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी तयार केलेल्या असतात. जर तुम्हीही एखादं असं फेक अॅप डाउनलोड केलं असेल, तर समोरून बँक डिटेल्स मागितले जातील आणि MPIN बाबत विचारणा केली जाईल. हे डिटेल्स भरल्यानंतर फ्रॉड करणाऱ्यांकडे तुमचे बँक डिटेल्स पोहोचतील. त्यामुळे तुमची खाजगी माहिती कोणालाही देऊ नका.
- फ्रॉडस्टर्स ग्राहकांना कॉल करुन स्वत:ला बँक कर्मचारी असल्याचं सांगतात आणि अकाउंट डिटेल्स आणि OTP मागतात. कोणत्याही व्यक्तीने OTP मागितल्यास शेअर करू नका. KYC च्या नावाने कॉल आला, तरीही माहिती देऊ नका.
- ईमेलमध्ये किंवा WhatsApp किंवा सोशल मीडियावर गिफ्ट व्हाउचर मिळण्याचा दावा करत लिंक आल्यास अशा लिंक ओपन करू नका. फ्रॉड करणारे इनकम टॅक्स डिपार्टमेंट, Visa, MasterCard नावाने फेक मेसेज किंवा ईमेल पाठवतात. त्यात अटॅचमेंच देतात. परंतु अशा लिंक ओपन करू नका.
- त्याशिवाय ज्यावेळी बाहेरील पब्लिक Wifi चा वापर करत असाल, त्यावेळी Online Transaction करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel, Online fraud