नवी दिल्ली, 17 एप्रिल : Google ने अँड्रॉइड स्मार्टफोनमधून आपलं एक फीचर हटवलं आहे. 2018 मध्ये लाँच झालेलं Google Snapshot फीचर आता युजर्सला वापरता येणार नाही.
9to5 Google रिपोर्टनुसार, गुगलने हे फीचर रिमूव्ह केलं आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनवर (Android Smartphone) चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं. पण अतिशय कमी लोकांना याबाबत माहिती होती. हे फीचर Google Assistant स्क्रिनवर इनबॉक्सप्रमाणे दिसायचं. यावर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांची सध्याची माहिती सहज मिळत होती. अपॉइंटमेंट, वेदर फोरकास्ट, ट्रॅफिक आणि रिमाइंडर यासारखे डिटेल्स एका क्लिकवर स्क्रॉलेबल इंटरफेससह मिळत होते.
हे छोटं पण अतिशय कामाचं फीचर होतं. अनेक अँड्रॉइड युजर्सला याबाबत माहिती नव्हती. या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने आपल्या App वर दिलेल्या एका नोटिसमध्ये Snapshot फीचर लवकरच बंद करणार असल्याचं सांगितलं होतं. पण गुगलने यासाठी कोणतीही डेट दिली नव्हती. आता मिड-एप्रिल 2022 मध्ये गुगलने हे App अँड्रॉइड स्मार्टफोन्समधून हटवलं आहे. हे फीचर गुगलच्या डिसकव्हर पेजवर दिलं जात होतं.
टेक्नोलॉजी ब्रँड गुगल युजर्सला आपल्या Apps सह सतत अपडेटेड ठेवू इच्छितं. परंतु अशाप्रकारे अनेकदा अनेक Apps युजर्सकडून अतिशय कमी प्रमाणात वापरले जातात किंवा अनेक युजर्सला याबाबत माहितीही नसते. त्यामुळे गुगलला App बंद करण्यासारखी पाऊल उचलावी लागतात. यापूर्वीही गुगलने अनेक Apps बंद केले होते.
कंपनीने 2012 मध्ये Google Now नावाचं एक फीचर लाँच केलं होतं. जे डिजीटल पर्सनल असिस्टेंटचं काम करत होतं. काळानुसार या फीचरची जागा Google Assistant ने घेतली. आता गुगलने Snapshot देखील बंद केलं. यासाठी कंपनीने एक सपोर्ट पेज जारी केलं आहे, त्यात युजर्स त्यांचा डेटा कुठे मिळवू शकतील याची माहिती मिळवता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.