नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : सध्याच्या काळात Google प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं ठरत असून अनेकांचं Google Account असतं. गुगल अकाउंट सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. तुमचं गुगल अकाउंट हॅकर्सपासून वाचवण्यासाठी कंपनीने एक नवं अपडेट लागू केलं आहे. यामुळे अकाउंट सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
Google Account ला 9 नोव्हेंबरपासून मोठं सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. यामुळे युजरला फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या अपडेटमध्ये Google Account चं टू-स्टेप वेरिफिकेशन ऑटोमेटेकली अॅक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे ज्या युजर्सला या अपडेटबाबत माहिती नाही, त्यांनादेखील याबाबत माहिती मिळेल.
युजरला टू-स्टेप वेरिफिकेशन चालू करण्यासाठी आपला फोन नंबर अकाउंटमध्ये अपडेट करण्याची आवश्यकता आहे.
Google Account असं करा सिक्योर -
Google Account सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे 'Security Checkup' टूलने आपलं अकाउंट चेक करणं गरजेचं आहे. गुगलच्या टू-स्टेप वेरिफिकेशनने युजर्सला अतिशय फायदा होऊ शकतो. एकदा टू-स्टेप वेरिफिकेशन केल्यानंतर, जर इतर कोणी किंवा युजरनेच दुसऱ्या डिव्हाइसमधून Sign-in करण्याचा प्रयत्न केला, तर Google लगेच अलर्ट करेल. दुसरा व्यक्ती तुमच्या अकाउंटमध्ये एट्री करण्याचा प्रयत्न करत असल्यास, त्याचीही माहिती मिळेल.
Two-step verification -
Google ने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2021 च्या शेवटपर्यंत कंपनी 15 कोटी गुगल युजर्ससाठी Two-step verification ऑटो-इनरोल करेल. तसंच 2 मिलियनहून अधिक YouTube क्रिएटर्ससाठी Two-step verification लागू होईल. त्याशिवाय युजरला पब्लिक नेटवर्कचा वापर करायचा असल्यास, Google युजरला Address Bar मध्ये वॉर्निंग देऊन युजर वापरत असलेलं पब्लिक डिव्हाइस सुरक्षित आहे की नाही याची माहिती देईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.