मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Gmail चे हे भन्नाट फीचर्स माहित आहेत का? या सुविधांसह मेल पाठवणं होईल अगदी सोपं

Gmail चे हे भन्नाट फीचर्स माहित आहेत का? या सुविधांसह मेल पाठवणं होईल अगदी सोपं

Google ने गेल्या 17 वर्षात आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्ससाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र Gmail चे असे काही फीचर्स आहेत, ज्याविषयी युजर्सला फारशी माहिती नाही.

Google ने गेल्या 17 वर्षात आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्ससाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र Gmail चे असे काही फीचर्स आहेत, ज्याविषयी युजर्सला फारशी माहिती नाही.

Google ने गेल्या 17 वर्षात आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्ससाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र Gmail चे असे काही फीचर्स आहेत, ज्याविषयी युजर्सला फारशी माहिती नाही.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : जगभरातील सर्वाधिक लोक Email साठी Gmail चा वापर करतात. स्टॅटिस्टिकच्या माहितीनुसार, 2021 च्या सुरुवातीला गुगलच्या ई-मेल सेवेचे जगभरात 1.5 अब्ज सक्रिय युजर्स होते. Gmail हा असा ई-मेल प्लॅटफॉर्म आहे, जिथे सातत्याने युजर्ससाठी नवे फीचर्स (Features) उपलब्ध करून दिले जातात. एक्सपायरी मोड, पासकोड, पाठवलेला ई-मेल अनसेंट करणं, विना इंटरनेट कनेक्शन ई-मेल पाठवणं अशा अनेक सुविधा Google ने गेल्या 17 वर्षात आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्ससाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र Gmail चे असे काही फीचर्स आहेत, ज्याविषयी युजर्सला फारशी माहिती नाही.

    Auto Advance Feature -

    प्रत्येक मेल तपासणं आणि अनावश्यक मेल डिलिट करणं हे काम तसं मुश्किल ठरू शकतं. त्यामुळे आपला ई-मेल अधिक व्यवस्थित आणि चांगला राहावा यासाठी तुम्ही Gmail वर ऑटो-अॅडव्हान्स सुविधा सुरू करू शकता. ही सुविधा सुरू करण्यासाठी या स्टेप्सचा वापर करावा.

    Settings – Advance - Enable Auto Advance - Save Changes.

    यानंतर पुन्हा सेटिंगमध्ये जावं. त्यानंतर General वर जात, ऑटो अॅडव्हान्सवर स्क्रोल (Scroll) करा आणि गो नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन वर जावं आणि त्यानंतर सेव्ह चेंजस या ऑप्शन वर क्लिक करा.

    एक्सटेंड सर्च ऑप्शन (Extend Search Option) -

    आपल्या युजर्ससाठी Extend Search Option दिला नसता, तर Gmail परिपूर्ण ठरलं नसतं. एक्सटेंड सर्चवर जाण्यासाठी सर्च बारवर उजव्या बाजूला असलेल्या सेटिंग आयकॉनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल.

    गुगल ड्राईव्हच्या (Google Drive) माध्यमातून मोठ्या Attachments पाठवा -

    Gmail च्या माध्यमातून तुम्ही केवळ 25 MB पर्यंतच्या Attachments पाठवू शकता. जर तुम्हाला यापेक्षा मोठ्या आकाराच्या अॅटॅचमेंट पाठवायच्या असतील तर तुम्ही Google Drive चा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल ड्राईव्हवर फाईल अपलोड करावी लागेल. त्यानंतर कंपोज सेक्शनमधील ड्राईव्ह आयकॉनवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर फाईल अॅटॅच करता येईल.

    फ्री Wifi वापरताना अशी घ्या काळजी; चोरी होऊ शकतो पर्सनल डेटा

    ई-मेल शेड्यूलिंग (Email Scheduling) -

    Gmail वर तुम्ही ई-मेल शेड्यूलिंग या सुविधेचा देखील लाभ घेऊ शकता. एखादा Email लिहून तुम्ही आवश्यक तारीख आणि वेळेसाठी शेड्यूल करू शकता. यासाठी सर्वात आधी Mail टाइप करा, त्यानंतर डाउन अॅरोवर टॅप करा, इथे Schedule Send हा पर्याय दिसेल. त्यानंतर प्रीसेट पर्यायावर दिनांक आणि वेळेची निवड करा. `Pick date and time` या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या गरजेनुसार दिनांक आणि वेळेची निवड करा.

    टास्कला (Task) ई-मेलची जोड देण्याची सुविधा -

    Gmail च्या या उपयुक्त फीचरविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही थेट Gmail च्या माध्यमातून एक टास्क तयार करू शकता. यासाठी ई-मेलवर उजव्या बाजूला क्लिक करा आणि टास्कमध्ये अॅड करण्याचा पर्याय निवडावा.

    Smartphone युजर्स घरबसल्या करू शकतात लाखोंची कमाई, बस करावं लागेल हे एक काम

    असा करा विना इंटरनेट Gmail चा वापर -

    Gmail युजर्सला ऑफलाइन अॅक्सेस मोड (Offline Access Mode) ही सुविधा देखील देतं. जरी तुमचं इंटरनेट बंद असेल किंवा व्यवस्थित कार्यरत नसेल तरी देखील तुम्ही Gmail वाचू शकता आणि त्याला रिप्लाय देऊ शकता. ही सुविधा तुम्हाला इनेबल (Enable) करावी लागेल आणि mail.google.com बुकमार्क करावं लागेल. ही सुविधा केवळ क्रोमवरच उपलब्ध आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा, त्यानंतर ऑफलाइन मेल इनेबल करा.

    First published:

    Tags: Gmail, Google, Tech news