नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : स्मार्टफोन वापरण्यासाठी आणि त्यातील फीचर्सचा आनंद घेण्यासाठी युजर्सला इंटरनेटची सुविधा गरजेची आहे. इंटरनेटशिवाय युजर्सला कोणतेही Apps वापरता येत नाही. त्यामुळे अनेक युजर्स हे इंटरनेट कनेक्शनसाठी Wi-Fi शोधत असतात. कारण त्यातून फास्ट स्पीड मिळतो आणि ते फ्री असल्याने अनेकांना हे सोयीस्कर वाटतं. परंतु अशा पद्धतीने मोफत Wi-Fi वापरणं हे युजर्सच्या (Free Wi-Fi addiction Can Be Dangerous) डेटा आणि प्रायव्हसीच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे हॅकिंगच्या (Private Data Can Be Stolen By Hackers) या धोक्यापासून काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
काय आहेत धोके?
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या फ्री Wi-Fi च्या सुविधेमुळे युजर्सच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनला हॅकिंगचा धोका असतो. कारण अशावेळी हॅकर्स डिवाईसला हॅक करून युजरची सर्व प्रायव्हेट (Tips For Using Free WI-FI) माहिती चोरू शकतात. कारण अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वाय-फायला पासवर्डची सुरक्षा नसते. त्यामुळे युजरने वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर त्याचा MAC Address आणि IP Address हॅकर्सकडे जाऊ शकतो.
त्यावेळी हॅकर्स Packets ला Intercept करून युजर्सची Browsing History मिळवतात. त्याचबरोबर हॅकर्स Network Sniffing करून Visible Traffic ला ही Intercept करू शकतात. त्यामुळे युजरचा सर्व डाटा सहजरित्या हॅकर्सकडे जमा होण्याची शक्यता असते.
त्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी...
- पासवर्ड नसलेल्या कोणत्याही फ्री Wi-Fi कनेक्शनला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप कनेक्ट करू नका. पब्लिक स्पेसच्या ठिकाणी फ्री Wi-Fi चा वापर करत असाल, तर त्यावेळी स्मार्टफोनवरून कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नका.
- सार्वजनिक ठिकाणच्या फ्री Wi-Fi कनेक्शनचा वापर करत असाल, तर त्यावेळी स्मार्टफोनवरून कोणत्याही प्रकारचं शेयरिंग करू नका.
- फ्री वाय-फाय कनेक्शन वापरण्याआधी त्याची विश्वासार्हता चेक करा. ते कोणत्या संस्थेचं आहे किंवा कोणाच्या नावाने आहे किंवा अजून किती लोक याचा वापर करतात. याची खात्री करा.
- त्याचबरोबर फ्री Wi-Fi चा वापर करताना Email ID लॉगिन करताना Original Password टाकू नका. वाय-फाय लॉगइन करताना नेहमी यूनिक पासवर्डचा वापर करा.
- फ्री Wi-Fi चा वापर करताना कोणत्याही प्रकारचा पासवर्ड स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Account hacked, Smartphones, User data