मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नोटिफिकेशन्स मिळणार एकाच ठिकाणी, जाणून घ्या काय आहे Beeper App

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नोटिफिकेशन्स मिळणार एकाच ठिकाणी, जाणून घ्या काय आहे Beeper App

बीपर अ‍ॅप वापरल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, अ‍ॅप आयमेसेज, स्लॅक, स्काइप आणि ट्विटर व इन्स्टाग्राम यांसारख्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सची नोटिफिकेशन्स एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मेसेजमुळे येणाऱ्या अ‍ॅलर्ट्समुळे होणारा त्रास वाचू शकेल.

बीपर अ‍ॅप वापरल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, अ‍ॅप आयमेसेज, स्लॅक, स्काइप आणि ट्विटर व इन्स्टाग्राम यांसारख्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सची नोटिफिकेशन्स एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मेसेजमुळे येणाऱ्या अ‍ॅलर्ट्समुळे होणारा त्रास वाचू शकेल.

बीपर अ‍ॅप वापरल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, अ‍ॅप आयमेसेज, स्लॅक, स्काइप आणि ट्विटर व इन्स्टाग्राम यांसारख्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सची नोटिफिकेशन्स एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मेसेजमुळे येणाऱ्या अ‍ॅलर्ट्समुळे होणारा त्रास वाचू शकेल.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 जून : या वर्षाच्या सुरुवातीला बीपर अ‍ॅपचं (Beeper App) नाव तुम्ही ऐकलं असेल. हेही तुम्ही वाचलं असेल, की बीपर अ‍ॅप वापरल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, अ‍ॅप आयमेसेज, स्लॅक, स्काइप आणि ट्विटर व इन्स्टाग्राम यांसारख्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सची नोटिफिकेशन्स (Notifications) एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मेसेजमुळे येणाऱ्या अ‍ॅलर्ट्समुळे (Alerts) होणारा त्रास वाचू शकेल. पण त्या अ‍ॅपचं काय झालं? काही लोकांसाठी हे अ‍ॅप तयारीत असून, इतरांना या अ‍ॅपसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. बीपरच्या डेव्हलपर्सचं म्हणणं आहे, की या अ‍ॅपच्या रोलआउटची प्रक्रिया सुरू असून, ते लवकरच सुरू होणार आहे.

हे अ‍ॅप मोफत मिळणार नाही. बीपर अ‍ॅपच्या वापरासाठी दर महिन्याला किमान 10 डॉलर एवढं शुल्क मोजावं लागणार आहे. ही एक बेस्ट डील आहे. कारण वारंवार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या नोटिफिकेशन्समुळे होणारा त्रास यामुळे कमी होणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. हे अ‍ॅप युजर्सकरता उपलब्ध करण्याआधी त्यातले काही बग दुरुस्त केले जात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

बीपर अ‍ॅपचे सहसंस्थापक एरिक मिगिकोवस्की यांनी एका ई-मेलमध्ये म्हटलं आहे, की ज्या व्यक्तींना हे अ‍ॅप्लिकेशन सेट करण्यात काही अडचणी येत आहेत, त्यांच्याशी ते व्यक्तिगत स्वरूपात झूम कॉलवरून संपर्क साधत आहेत, चर्चा करत आहेत. गेल्या महिन्यात एका नव्या सर्व्हरवर रूपांतरित करण्यात आल्यामुळे सेवेचा वेग मंदावला होता, असंही त्यांनी सांगितलं. आगामी महिन्यांत सेवेचा वेग आणि विस्तार सहजपणे वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीपर हे मल्टिप्लॅटफॉर्म अ‍ॅप आहे. अ‍ॅपल आयफोन, आयपॅड, अँड्रॉईड फोन, मायक्रोसॉफ्ट विंडोज, कम्प्युटिंग डिव्हाईस (Computing Device) आणि लिनक्स (Linux) यांसाठीही ते उपलब्ध आहे. अँड्रॉईड फोनवर iMessage काम करण्यासाठी काही निफ्टी वर्कअराउंडची आवश्यकता असते. बीपर इन्बॉक्ससाठी फिल्टर असतील. तसंच सगळ्या चॅट नेटवर्कमध्ये शोधण्याच्या क्षमतेसह स्नूझ किंवा संदेश संग्रहित करण्याची क्षमताही असेल.

(वाचा - बुकिंग ओपन होताच या Electric Bike ची धूम, 2 तासात 50 कोटींची ऑर्डर)

सध्या बीपर एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे इन्व्हिटेशन्स (Invitations) देत आहे. ज्यांनी वर्षभरापूर्वी पेमेंट केलं होतं, ते या यादीत आघाडीवर आहेत. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला इन्व्हिटेशन्स पाठवली गेली होती. 10 डॉलर प्रति महिना बिलिंगचा पर्याय निवडलेल्यांना प्रथम इन्व्हिटेशन्स पाठवण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यात बीपरसाठी साइन अप करून एक युजरनेम रजिस्टर केलेल्यांना इन्व्हिटेशन्स पाठवली जाणार आहेत. येत्या काही महिन्यांत सगळ्यांसाठी हे अ‍ॅप रोलआउट करू शकू, असा विश्वास डेव्हलपर्सनी व्यक्त केला आहे. बीपरचं वैशिष्ट्य असं आहे, की अजून तरी अशा प्रकारचं दुसरं कोणतंही अ‍ॅप नाही. बहुतांश लोकप्रिय मेसेजिंग आणि सोशल मीडिया अ‍ॅपमध्ये प्लगइन करून सगळ्यांना एकाच स्थानावर ठेवू शकेल, असं कोणतंही अ‍ॅप सध्या नाही.

(वाचा - Paytm ची जबरदस्त ऑफर; मोफत iPhone 12 मिळवण्याची संधी, करावं लागेल हे एक काम)

सोप्या भाषेत हे अ‍ॅप युजरच्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सना एकाच छताखाली आणतं. ते एकच अ‍ॅप ओपन करून तुम्ही लिंक केलेल्या सर्व अ‍ॅप्समधील मेसेज वाचू शकता किंवा रिप्लाय देऊ शकता. सध्या WhatsApp, Signal, Telegram, Facebook Messenger, Apple iMessage, Slack, Skype, Hangouts, Twitter, Instagram, Android Messages, IRC, Matrix, Discord आणि Beeper नेटवर्क एका अ‍ॅपमध्ये आणणं शक्य आहे. यात बहुतांश लोकप्रिय इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सही आहेत. तसंच, LinkedIn, Line, GroupMe, Microsoft Teams, WeChat, काकाओ यांनाही बीपर अ‍ॅप सपोर्ट करणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Social media app, Tech news