नवी दिल्ली, 21 जून : भारतातील पॉप्युलर डिजीटल पेमेंट सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. या नव्या ऑफरला iPhone Bonanza नावं देण्यात आलं आहे. जर तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर Paytm वर तुमचं विज बिल पेमेंट केल्यानंतर ही जबरदस्त ऑफर मिळू शकते.
Paytm च्या माध्यमातून विज बिल भरल्यास iPhone फ्रीमध्ये मिळवण्याची ऑफर घेऊ शकता. जे युजर्स 8 जून ते 8 जुलैदरम्यान Paytm App च्या माध्यमातून आपलं विज बिल भरतील, त्यांना iPhone 12 मोफत जिंकण्याची संधी आहे.
विजेत्यांना 31 जुलै 2021 पर्यंत ईमेल आणि फोन कॉलच्या माध्यमातून याबाबत सांगितलं जाईल आणि सफल वेरिफिकेशनवर पेटीएम मॉल व्हॉउचर दिलं जाईल. विजेता पेटीएम मॉलमध्ये लॉगइन करू शकतात, व्हाउचर कोड टाकू शकतात आणि आयफोन 12 मोफत ऑर्डर करू शकतात.
अधिक सुविधा आणण्यासाठी पेटीएमने नुकतंच 2-स्टेप पेमेंट, एसएमएस आणि इन-अॅप नोटिफिकेशनच्या माध्यमातून विज बिल पेमेंट करण्याचा अनुभव अधिक चांगला केला आहे. यासाठी युजर्सला केवळ आपलं राज्य आणि प्रोव्हायडर निवडावा लागेल. युजरला त्यांचा बिल नंबर किंवा ग्राहक नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर पेमेंट करावं लागेल. त्याशिवाय पेटीएमवर पहिल्यांदा विज बिल पेमेंट करणाऱ्या युजर्सला 50 रुपयांपर्यंतचा गॅरेंटी कॅशबॅकही मिळेल.
पेटीएम प्रवक्त्यांनी सांगितलं, की युजर्सला सहज डिजीटल पेमेंट सेवांसह सक्षम बनवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहणार आहे, जे जीवन सोपं करण्यास मदत करतात. आम्ही कर्नाटक, दिल्ली, यूपी, तेलंगानापासून लक्षद्वीपपर्यंत देशातील कानाकोपऱ्यातून विज मंडळांना जोडलं आहे. त्याशिवाय मणिपूर, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणीही कामं सुरू आहेत. आमच्या नव्या ऑफरसह आम्ही देशभरात नव्या युजर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Paytm, Paytm offers, Tech news