मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बुकिंग ओपन होताच या Electric Bike ची धूम, 2 तासात 50 कोटींची ऑर्डर

बुकिंग ओपन होताच या Electric Bike ची धूम, 2 तासात 50 कोटींची ऑर्डर

केवळ दोन तासात या बाईकच्या सर्व यूनिट्स बुक झाल्या आहेत. सर्व यूनिट बुक झाल्यामुळे कंपनीला बुकिंग बंद करावं लागलं.

केवळ दोन तासात या बाईकच्या सर्व यूनिट्स बुक झाल्या आहेत. सर्व यूनिट बुक झाल्यामुळे कंपनीला बुकिंग बंद करावं लागलं.

केवळ दोन तासात या बाईकच्या सर्व यूनिट्स बुक झाल्या आहेत. सर्व यूनिट बुक झाल्यामुळे कंपनीला बुकिंग बंद करावं लागलं.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 21 जून : इलेक्ट्रिक बाईक Revolt RV400 चं बुकिंग सुरू होताच बाजारात याची चांगलीच चर्चा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ दोन तासात या बाईकच्या सर्व यूनिट्स बुक झाल्या आहेत. सर्व यूनिट बुक झाल्यामुळे कंपनीला बुकिंग बंद करावं लागलं. परंतु कंपनीने ते पुन्हा या बाईकचं बुकिंग सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. केवळ दोन तासात 50 कोटी रुपयांचं बुकिंग झालं आहे. ड्रायव्हिंग रेंज - कंपनीने रिवोल्ट 400 बाईकमध्ये 3 बाईक मोड्स दिले आहेत. ज्यात एको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड सामिल आहे. एको मोडमध्ये ही बाईक 45 किलोमीटर ताशी टॉप स्पीडसह 156 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. तर नॉर्मल मोडमध्ये 65 किलोमीटर ताशी टॉप स्पीडसह 110 किलोमीटरची रेंज देते. याच्या स्पोर्ट्स मोडमध्ये 65 किलोमीटर ताशी टॉप स्पीडसह 80 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग स्पीड मिळेल.

(वाचा - टाटा मोटर्सने पुण्यात उभारला देशातील सर्वात मोठा सोलर कारपोर्ट)

कसं कराल बुकिंग - Revolt RV400 आणि Revolt RV300 बाईकचं बुकिंग ग्राहक अधिकृत वेबसाईटवरुन करू शकतात. त्यासाठी ग्राहकांना बाईक Notify me टॅपवर क्लिक करुन रजिस्टर करावं लागेल. Revolt RV300 बाईकच्या बुकिंगसाठी ग्राहकांना 7199 रुपये बुकिंगसाठी भरावे लागतील. तर Revolt RV400 बाईकच्या बुकिंगसाठी 7,999 रुपये द्यावे लागतील.

(वाचा - Electric टू व्हिलर्सच्या किमतीत होणार मोठी कपात; हे आहे कारण)

इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर व्हावा यासाठी सरकारने आपल्या फेम 2 स्किमला रिवाईज्ड केलं आहे. ज्याअंतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सवर सरकार आता अधिक सबसिडी देत आहे. घरगुती इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणारी सबसिडी 10 हजार रुपये प्रति kWh होती. आता ती 15 हजार रुपये प्रति kWh करण्यात आली आहे. फेम 2 मधील बदलांनंतर Revolt RV400 ची किंमत 90,799 रुपये झाली आहे, जी आधी 1,18,999 रुपए (एक्स-शोरूम दिल्ली) होती. कंपनीकडून Revolt RV300 च्या किमतीत कोणतीही कमी करण्यात आलेली नाही.
First published:

Tags: Electric vehicles

पुढील बातम्या