मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर

दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर

दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. Apple ऑफिशियल रिसेलरकडून एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.

दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. Apple ऑफिशियल रिसेलरकडून एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.

दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. Apple ऑफिशियल रिसेलरकडून एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : Apple चा नवा iPhone 13 काही दिवसांपूर्वी लाँच झाला. iPhone 13 सह Apple Watch Series, iPad, iPad mini देखील लाँच झाला. iPhone 13 घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. Apple ऑफिशियल रिसेलरकडून एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये iPhone स्वस्तात 55,900 रुपयांत खरेदी करता येईल.

iPhone 13 ऑफर -

iPhone 13 ची किंमत 79,900 रुपये आहे. रिसेल HDFC बँक 6 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. त्याशिवाय 3 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफरही आहे. यात तुमचा जुना iPhone एक्सचेंज करू शकता.

iPhone 13 Specifications -

- 6.1 इंची सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले

- A15 बायोनिक चिप

- 3,227mAh बॅटरी, 20W वायर्ड फास्ट चार्जिंग

- iOS 15

- प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सल, 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेंसर

1 नोव्हेंबरपासून या Smartphone मध्ये WhatsApp सपोर्ट करणार नाही, लगेच घ्या बॅकअप

14 सप्टेंबर रोजी iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 pro आणि iPhone 13 pro max लाँच करण्यात झाले. भारतात iPhone 13 बेस 128GB वेरिएंटची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 13 च्या 256GB वेरिएंटची किंमत 89,900 आणि 512GB ची किंमत 1,09,900 रुपये आहे.

त्याशिवाय iPhone 13 pro च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये आहे. याच्या 256GB वेरिएंटची किंमत 1,29,900 आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये आहे.

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट

iPhone 13 Pro च्या 1TB वेरिएंटची किंमत 1,69,900 रुपये आहे. तर iPhone 13 Pro Max च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आहे. iPhone 13 Pro Max च्या 256GB मॉडेलची किंमत 1,39,900 रुपये, 512GB वेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये आणि iPhone 13 Pro Max च्या 1TB स्टोरेजची किंमत 1,79,900 रुपये आहे.

iPhone 13 सीरिजमध्ये सर्वात स्वस्त iPhone 13 Mini आहे. याच्या 128GB वेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे. तर 256GB स्टोरेजची किंमत 79,900 रुपये आणि 512GB स्टोरेज 99,900 रुपयांना आहे.

First published:

Tags: Apple, Iphone, Smartphone