मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

1 जूनपासून Technology क्षेत्रात होणार बदल, YouTube, Google photos चे हे बदल माहितेय का?

1 जूनपासून Technology क्षेत्रात होणार बदल, YouTube, Google photos चे हे बदल माहितेय का?

1 जूनपासून Technology क्षेत्रात काही बदल पाहायला मिळणार आहेत.

1 जूनपासून Technology क्षेत्रात काही बदल पाहायला मिळणार आहेत.

1 जूनपासून Technology क्षेत्रात काही बदल पाहायला मिळणार आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 29 मे : 1 जूनपासून Technology क्षेत्रात काही बदल पाहायला मिळणार आहेत. 1 जूनपासून Google एक मोठा बदल करणार आहे. Google Photos मध्ये 1 जूननंतर अनलिमिटेड फोटोज अपलोड करता येणार नाहीत.

बंद होणार Google ची ही खास सर्विस -

Google ने दिलेल्या माहितीनुसार, 15GB स्पेस प्रत्येक युजरला दिला जाईल. या स्पेसमध्ये Gmail चे Email सामिल आहेत आणि फोटोजही सामिल असतील. याच स्पेसमध्ये Google Drive ही सामिल आहे, जिथे बॅकअप घेतला जातो. जर 15GB हून अधिक स्पेसचा वापर करायचा असेल, तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील.

Battlegrounds Mobile India -

18 जून रोजी Battlegrounds Mobile India लाँच होण्याच्या तयारीत आहे. सध्या हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी Google Play Store वर उपलब्ध आहे.

(वाचा - 1 जूनपासून बंद होतेय Google ची खास सर्विस; पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम)

YouTube वरुन पैसे कमावणाऱ्यांना द्यावा लागणार Tax -

YouTube अनेकांच्या कमाईचं साधन झालं आहे. परंतु आता 1 जूनपासून यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर टॅक्स द्यावा लागेल. पण यात केवळ त्याच Views साठी टॅक्स द्यावा लागेल, जे अमेरिकी व्ह्यूवर्सकडून मिळाले आहेत.

(वाचा - PUBG गेम आता नव्या नावानं परतला; प्री-रजिस्ट्रेशन सुरू, कसं कराल?)

Jio आणि Itel सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी -

Itel, Reliance Jio सह मिळून आपला A23 Pro 4G स्मार्टफोन जबरदस्त डीलमध्ये खरेदी करण्याची संधी देत आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 4999 रुपये होती, परंतु या डीलमध्ये युजर्स हा स्मार्टफोन 3899 रुपयांत खरेदी करू शकतात. विशेष बाब म्हणजे, फोनच्या खरेदीसह युजरला 3 हजार रुपयांचा रिचार्ज बेनिफिटही ऑफर केला जात आहे. 3 हजार रुपयांचा रिचार्ज बेनिफिट यअनेक व्हाउचर्सच्या रुपात मिळेल. हे व्हाउचर्स रिडीम करण्यासाठी युजरला आपल्या जिओ नंबरवर 249 रुपये किंवा त्याहून अधिकचा रिचार्ज करावा लागेल.

First published:

Tags: Google, Reliance Jio, Youtube